मुंबई - मुंबई महापालिकेकडून नगरसेवकांना विकास निधी दिला जातो. पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९७५ कोटीची मागणी असताना पालिका आयुक्तांनी ६५० कोटींचा निधी दिला. हा निधी कमी केल्यानंतर मुंबई महापालिकेतील राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
विकास निधी वाटपावरून मुंबई महापालिकेत आरोप -प्रत्यारोप सुरूच
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या माध्यमातून ६५० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांना नुकतेच करण्यात आले. मात्र आयुक्तांनी २५० कोटींचा निधी कपात केल्याच्या विषयावरून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा यांच्यात आरोप प्रत्यारोप होत होते.
मुंबई महापालिका
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या माध्यमातून ६५० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांना नुकतेच करण्यात आले. मात्र आयुक्तांनी २५० कोटींचा निधी कपात केल्याच्या विषयावरून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा यांच्यात आरोप प्रत्यारोप होत होते. भाजपचे शिरसाट व पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यात यआरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Last Updated : Mar 5, 2021, 9:38 PM IST