मुंबई :मुंबई विद्यापीठाचे कलिना आवारात दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून वांद्रे कुर्ला संकुल या परिसरातीलमुंबई महानगर प्राधिकरणाच्या मैदानावर जोरात तयारी सुरु आहे. मेळाव्यासाठी ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांसाठी वाहनतळ मुंबई विद्यापीठाच्या आवारात करण्याचे काम सुरू (Municipal Corporation Violation of environment) आहे. याला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या युवकांनी हरकत घेतलेली आहे. जर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण आणि महापालिका यांनी हे काम रोखलं नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा अॅड. अमोल मातेले राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते यांनी दिला (NCP protest against Municipal Corporation) आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट -राज्यात शिवसेना मुळ कोणाची, पक्षाचे चिन्ह याच्यावर मालकी कोणाची याबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. रस्त्यावरील संघर्ष सुरू आहे. राजकीय टीका क्षणाक्षणाला जनतेसमोर येत आहे. एकीकडे न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे. त्याचा निकाल अजून काही काळाने लागेल. मात्र तोपर्यंत राजकीय वातावरण तापणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाची सभा मुंबईतील मुंबई महानगर प्राधिकरणाच्या मैदानावर नियोजित केलेली आहे. या सभेसाठी दसरा मेळाव्याला राज्यातून लाखो लोक गाड्या भरून येणार आहेत .