महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजकीय परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चीड, फायदा उद्धव ठाकरे गटालाच - political situation

उद्धव ठाकरे,( Uddhav Thackeray ) एकनाथ शिंदे गट ( Eknath Shinde group ) असे दोन गट झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले आहे. शिवसेनेत फूट पडल्याने त्याचा परिणाम येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर ( Municipal election ) होईल का अशी चर्चा सध्या रंगली आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

By

Published : Oct 10, 2022, 10:55 PM IST

मुंबई -शिवसेनेत उद्धव ठाकरे,( Uddhav Thackeray ) एकनाथ शिंदे गट ( Eknath Shinde group ) असे दोन गट झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले आहे. शिवसेनेत फूट पडल्याने त्याचा परिणाम येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर ( Municipal election ) होईल का अशी चर्चा सध्या रंगली आहे. मात्र सध्या ज्या घडामोडी होत आहेत यामुळे भाजपा-शिंदे गटाच्या विरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली असून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती तयार झाली आहे. यामुळे याचा फायदा येत्या निवडणुकीत होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

शिवसेना भाजपा आणि शिंदे वाद - मुंबई महापालिकेमध्ये गेले २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. या कालावधीत भाजपा हा शिवसेनेचा मित्र पक्ष होता. २०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान ( Narendra Modi Prime Minister ) तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री झाल्यावर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देत पाहारेकरी म्हणून काम करू असे जाहीर केले. गेले पाच वर्षे भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे काम केले आहे. कोविड पासून इतर अनेक प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप करत भाजपाने शिवसेनेविरोधात आंदोलने केली आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) स्थापन केले. त्यानंतर शिवसेना, भाजपा यांच्यामधील वाद वाढत गेला.

पक्षाचे नाव, चिन्ह वापरण्यास बंदी -जून २०२२ मध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यायला लावला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी केल्यावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला आहे. याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. तर शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातली आहे.

उद्धव ठाकरे गटाला फायदाच -नागरिकांना कोणत्याही गरजेच्या वेळी मदतीला धावून येणारे म्हणून शिवसैनिकांची ओळख आहे. १९८९ पासून शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आदी निवडणूका धनुष्यबाण या चिन्हावर लढवत आली आहे. सध्या निवडणूक आयोगाने शिवसेना नाव , धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला नवीन नावासह अंधेरी येथील पोटनिवडणूक, पालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. सध्या टेक्नॉलॉजीचे युग आहे यामुळे उद्धव ठाकरे गटाला आपल्या पक्षाचे नाव, चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज पडणार नाही. भाजप, एकनाथ शिंदे गटाविरोधात सध्या मुंबईकर, राज्यातील जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. ही चीड येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला फायदा करून देईल अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेतील जेष्ठ पत्रकार सुनील शिंदे यांनी दिली.

चीड मतांच्या पेटीतून दिसेल -या पोटनिवडणुकीत निवडणुकीत जनतेची चीड लोकशाहीच्या माध्यमातून दिसून येईल. शिवसेना हा पक्ष नव्हे तर कुटंब आहे. हे दसरा मेळाव्याच्या दिवशी सर्वांनी पाहिले आहे. कारण नसताना शिंदे गटाने पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. राजकीय क्रौर्य किती भयाण आहे, याची प्रचिती आली आली आहे. आम्ही खचणार नाही, आम्ही कधीही घाबरणार नाही. आम्ही तेवढ्याच जोमाने पुढे जावू, असा ठाम निर्धार माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. तुम्ही बाळासाहेबांची चिंगारी संपवू शकत नाही, आज कोठेही जा सगळीकडे लोक चिडीने बोलत आहेत. ही चीड मतांच्या पेटीतून आपल्याला दिसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details