मुंबई- राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने 27 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांना शपथ देऊन बहुमत चाचणी घेण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नेत्यांच्या प्रतिक्रिया -
शरद पवार - (अध्यक्ष, राष्ट्रवादी)
हा निकाल योगायोगाने #संविधान_दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे.
संजय राऊत (खासदार, शिवसेना)
या देशात न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे. न्यायालयात आम्ही जे बोलत होतो, ते सत्य होते. न्यायालयाच्या निकालाने ते खरं ठरलं आहे. सत्याचा विजय झाला आहे.
सचिन सावंत (प्रवक्ते, काँग्रेस)
भाजप आता तोंडावर आपटला आहे. यांचा अनैतिकतेचा कारभार सर्वाच्च न्यायालयाच्याही लक्षात आला आहे. हा निकाल ऐतिहासिक असून त्याचे आम्ही स्वागत करतो