महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा रंगतदार इतिहास - राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे काय

देशात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना राखीव चिन्ह देण्यात येतात, तर इतर अपक्ष उमेदवारांना अराखीव चिन्ह दिली जातात... महाराष्ट्रातील काही प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांच्या निवडणुक चिन्हांचा घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या निवडणुक चिन्हांचा रंगतदार इतिहास

By

Published : Sep 23, 2019, 2:01 PM IST

मुंबई -निवडणूक चिन्हांसाठी अनेक पक्ष आणि उमेदवारांमध्ये वाद झाल्याचे अनेकदा आपण पाहतो. अमुकच चिन्ह मिळावे, म्हणून उमेदवारांचा आणि राजकीय पक्षांचा हट्ट असतो, याचे कारण राखून ठेवण्यात आलेली चिन्हे कालांतराने मतदारांच्या कायम लक्षात राहतात. यामुळे ही चिन्हे त्या राजकीय पक्षांची बोध चिन्हे होतात. अशा राखीव चिन्हांचा फायदा राजकीय पक्षाला आणि त्यांच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मिळतो. तर पाहुयात महाराष्ट्रात सध्या असलेल्या काही प्रमुख राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे काय आहेत, आणि त्यांचा इतिहास...

सामान्य जनता व मतदारांच्या संदर्भात राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह हीच त्याची खरी ओळख असते. स्वातंत्र्योत्तर काळात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 मध्ये झाली, तेव्हापासूनच निवडणूक चिन्हांचा इतिहासाला सुरुवात झाली. राजकीय पक्ष व त्यांच्या निवडणूक चिन्हांचा मागोवा घेतल्यास प्रामुख्याने लक्षात येणारी बाब म्हणजे, सर्वच राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांमध्ये वेगवेगळय़ा संदर्भात व वेगवेगळय़ा कारणाने घडून आलेले बदल.

हेही वाचा... पक्षांतराचे पर्व... युतीत आले आघाडीचे 'साखर सम्राट' सर्व!

देशातील आणि राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांच्या निवडणूक चिन्हांचा इतिहास

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : निवडणूक चिन्ह - पंजा (उजव्या हाताचा)

काँग्रेसची बैलगाडी ते हातापर्यंतचा प्रवास : काँग्रेस हा भारतीय राजकारणातील सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बैलजोडी हे निवडणूक चिन्ह स्वीकारले होते. त्यानंतर काँग्रेसने हे चिन्ह बदलून इंदिरा कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात गाय-वासरू हे चिन्ह घेतले. त्यानंतर 1980 मध्ये काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यावर गाय-वासरू हे चिन्ह काढल्यानेने इंदिरा काँग्रेसने ‘हाताचा पंजा’ हे निवडणूक चिन्ह स्वीकारले. त्यांचा विश्वास होता की हाताचा पंजा शक्ती, ऊर्जा आणि एकतेचा प्रतीक आहे.

भारतीय जनता पक्ष (भाजप) : निवडणूक चिन्ह - कमळाचे फुल

जनसंघाची पणती ते भाजपचे कमळ : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये स्थापित केलेला भारतीय जनसंघ 1977 मध्ये केंद्रात सत्तेत आलेल्या जनता पार्टीमध्ये सामील होता. यामुळे जनसंघाचे पणती हे चिन्ह गोठविण्यात आले. यानंतर जनता पार्टीत फूट पडल्यावर 1980 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाने कमळ या चिन्हाचा स्वीकार केला. तेव्हापासून भाजपचे कमळ हे चिन्ह कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : निवडणुक चिन्ह - घड्याळ

राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेले घड्याळास एक निळ्या रंगाचे बाह्य वर्तुळ आहे. यात तळाशी दोन पाय आणि डोक्यावर अलार्मचे बटण आहे. दहा वाजून दहा मिनिटे वाजल्याची वेळ दर्शवणारे घड्याळ हे राष्ट्रवादीचे राखीव चिन्ह आहे. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी राष्ट्रवादी आपल्या तत्त्वांसाठी दृढतेने लढत आहे, असे हे चिन्ह सूचित करते.

शिवसेना : निवडणूक चिन्ह - धनुष्यबाण

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्य-बाण हे आहे. सहसा हे चिन्ह पक्षाच्या केशरी रंगाच्या ध्वजावर वापरले जाते. केशरी रंग हिंदू धर्माचे प्रतीक आहे. त्याच वेळी, हा रंग पक्षाच्या मजबूत हिंदू राष्ट्रवादी भावनांकडेही संकेत करतो.
एक विशेष - 'उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणेच, झारखंडमधील शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचेही निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हेच आहे.

हेही वाचा... इतिहास 'मनसे' च्या बाजूने! शिवसेनाही कधी काळी होती अडचणीत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) : निवडणुक चिन्ह - रेल्वे इंजिन

मनसेचे निवडणूक चिन्ह उजवीकडे जात असलेला 'रेल्वेचा स्टीम इंजिन' आहे. पक्ष त्याचा वापर तीन रंगाच्या ध्वजावर करते, ज्यावर दोन पांढरे पट्टे देखील आहे. ध्वजाच्या शीर्षावर गडद चमकदार निळा रंग, मग पांढरी पट्टी मग केशरी रंगानंतर पुन्हा पांढरी पट्टी आणि शेवटी हिरवा रंग असतो.

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या निवडणुक चिन्हांचा रंगतदार इतिहास

बहुजन समाज पक्ष (बसप) : निवडणूक चिन्ह - हत्ती

'हत्ती' प्रमाणेच बसपाची शक्ती : डाव्या बाजूला पाहणारा हत्ती बसपाचा प्रतीक आहे. बसपाचे निवडणूक चिन्ह 'हत्ती' शारीरिक शक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही दर्शवते. या निवडणूक चिन्हाविषयी बसपचा असा विश्वास आहे, की 'बहुजन समाज' किंवा समाजातील दलित वर्गांची विशाल लोकसंख्या दर्शवणारे आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) निवडणूक चिन्ह - कोयता-हातोडा

सीपीआय (एम) चे निवडणूक चिन्ह कोयता-हातोडा आहे. म्हणजे शेतमजूर आणि कारखाने कामगार यांचे प्रतीक.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) निवडणूक चिन्ह - बाली-कोयता

सीपीआयचे निवडणूक चिन्ह बाली-कोयता 1952 पासून वर्तमानापर्यंत तेच आहे. तथापि या पक्षात देखील तूट पडली आणि एक नवीन गट मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तयार झाले, जे 1967 पासून निवडणुकीत सहभागी होत आहे.

वंचित बहुजन आघाडी : निवडणूक चिन्ह - गॅस सिलेंडर

लोकसभेला राजकारणात धुमाकुळ घालणाऱ्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाला नुकतेच 'गॅस सिलेंडर' हे चिन्ह देण्यात आले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागा वंचित ‘गॅस सिलेंडर’ या नव्या चिन्हावर लढणार आहे.

या व्यतिरिक्त महाराष्ट्रात काही प्रमुख नोंदणीकृत राजकीय पक्ष असून त्यांची निवडणूक चिन्हे देखील राखीव आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details