मुंबई :- टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे पालघरमधील चिरोटी येथे कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. निधनाची बातमी धडकताच राज्यातील उद्योग जगतासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून दु:खद संवेदना व्यक्त केल्या जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Political leaders Reaction on Cyrus Mistry death आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून सायरन मिस्त्री यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान - "सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक पराक्रमावर विश्वास ठेवणारे ते एक आश्वासक व्यापारी नेते होते. त्यांच्या जाण्याने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री -"टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजकच नव्हते तर एक तरुण, तेजस्वी आणि दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणून उद्योगक्षेत्रातही त्यांच्याकडे पाहिले जात होते. ही खूप मोठी हानी आहे.. माझी मनापासून श्रद्धांजली."
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री- ''प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ''
नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री -" टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री जी यांचे पालघर, महाराष्ट्राजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाल्याबद्दल कळून खूप दुःख झाले.्यांच्या कुटुंबीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो."