महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Balasaheb Thackeray Death Aniversary :  राजकीय नेत्यांनी वाहिली बाळासाहेबांना आदरांजली - छगन भुजबळ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death Aniversary) यांचा बुधवार (आज 17 नोव्हेंबर) स्मृतिदिन आहे. या स्मृतीदिनापार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर, छगन भुजबळ, दीपक केसरकर तसेच खासदार अरविंद सावंत बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेतले.

Balasaheb Thackeray Death Aniversary
Balasaheb Thackeray Death Aniversary

By

Published : Nov 17, 2021, 3:14 PM IST

मुंबई -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death Aniversary) यांचा बुधवार (आज 17 नोव्हेंबर) स्मृतिदिन आहे. या स्मृतीदिनापार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर, छगन भुजबळ, दीपक केसरकर तसेच खासदार अरविंद सावंत बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया झाल्याने ते उपस्थित राहू शकले नाही. यावेळेस त्यांनी ऑनलाईन दर्शन घेतले.

हिंदू मुस्लिम वाद करायचा - छगन भुजबळ

आम्ही साहेबांचे उजवे हात असून, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास कटिबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळेस त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यात अनेक लोकांचे बलिदान आहे. बलिदानापोटी हे सगळे मिळाले आहे. पवार साहेबांनी म्हटले की यांची नोंद घेण्याची गरज नाही. समाजमाध्यमातून हे बोलला जात आहे त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. त्याविरोधात सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे. काहीतरी काढायचे आणि हिंदू मुस्लिम वाद करायचा आणि राजकीय पोळी भाजायची. मुख्य प्रश्न बाजूला सरळ जातात आणि हिंदू मुस्लिमकडे लक्ष केंद्रीत होत असल्याचेही छगन भुजबळ म्हणाले.

दंगलीचा राजकीय फायदा नको - दीपक केसरकर

कोणी नाटक करत असतील तर त्याला काय बोलायचं. बाळासाहेब यांच्या नावाने पदे अनेकांनी भूषवली. बाळासाहेब असताना त्यांनी त्यांची बदनामी केली. कोकणातील अनेक लोक मुंबईत रहातात. मुंबईकरांना धक्का देण्याचा काम सुरू आहे. महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी जागरूक राहायला हवे. कोणतीही दंगल झाल्यावर राजकीय फायदा घ्यायला नको. दंगल शमवणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे. हिंदूत्वाची मशाल बाबासाहेबांनी पेटवली ती तशीच पेटत राहणार. ती शमावणाऱ्यांचा बंदोबस्त करायला हवा, असेही दीपक केसरकर म्हणाले.

ठरावाआधी भाजपचे डरावडराव - अनिल देसाई
देशप्रेम हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनात अखंड दिसून येतो. मागच्या वर्षी कोरोना गडद सावट होते. यंदा योग्य ती काळजी घेऊन व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व कामे संपूर्ण दिवसभर या ठिकाणी होत राहील. शिवसैनिक शिस्तप्रिय असल्याचे दर्शन या ठिकाणी होत आहे. उद्धवजींचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेला मिळाले आहे. पण महाराष्ट्र अधिक गतिमान करण्यासाठी राज्याला त्याचं नेतृत्व लाभले आहे. 1997 पासून निवडणूक त्यांनी सांभाळल्या आहेत. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा हा 5 वेळा फडकला आहे. विविध माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नाव येते. महाराष्ट्रसुजलाम सुफलाम करून दाखवायचे आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. पोस्ट सर्जरीनंतर काळजी आणि उपचार महत्त्वाचे असतात. कोरोना कमी झाला तरीही ते कमी झाले नाही. उद्धव ठाकरे यांची पोस्ट सर्जरी काळजी घेत असल्याचेही अनिल देसाई म्हणाले. भाजपचा तो ठराव होता का ? असा सवालही त्यांनी यावेळेस केला.

नको त्या माणसाला किंमत देण्याची गरज नाही - अरविंद सावंत
बाळासाहेब आजही आमच्या हृदयात भिनलेले आहेत. आजच्या दिवशी मन दाटून येते. दसऱ्याच्या भाषणावेळी मोठी उर्जा घेऊन जात होतो. बाळासाहेब ही शिवसैनिकांची भक्ती आहे. बाळासाहेबांसाठी राष्ट्र पहिले होते. त्यांनी राजकीय लाभाचा कधीही विचार नाही केला. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयतेला धरुन आहे. मोहन भागवत म्हणाले होते की, आमचा डीएनए एक आहे. बाळासाहेबांचं नाव घेणं त्यांनी सोडलं पाहिजे. साहेबांची पुण्यतिथी असताना हे कार्यक्रमांचं उद्घाटन करत आहे, हे सर्व दांभिक आहे. बाळासाहेबांचं नाव घेणं सोडा. शब्द पाळणारे लोकं आम्ही आहोत. एका चिडीतून हे सरकार स्थापन झालं आहे. असेही ते म्हणाले. नको त्या माणसाला किंमत देण्याची गरज नाही.

हेही वाचा -Balasaheb Thackeray Death Aniversary : बाळासाहेब ठाकरे कार्टुनिस्ट ते शिवसेना प्रमुख असा होता प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details