महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut Political Journey : बाळासाहेब ते आदित्य ठाकरे, कसा राहिला आहे संजय राऊत राजकीय प्रवास, जाणून घ्या - संजय राऊत ताज्या बातमी

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही प्रमुख नेत्यांची नावे चर्चिली जातात त्यात संजय राऊत ( Sanjay Raut ) हे नाव हमखास घेतलं जात. पत्रकार ते शिवसेना नेता, खासदार आणि आधुनिक चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊत यांचे या तीन पिढ्यानसोबत का जुळते आहे हे जाणून घेऊया?

Sanjay Raut Political Journey
Sanjay Raut Political Journey

By

Published : Jun 16, 2022, 7:39 PM IST

मुंबई -शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya thackeray ) यांनी नुकताच आयोध्या दौरा केला. या दौऱ्याचे नियोजन करण्यापासून ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहण्यात खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आदित्य ठाकरे यांचा दौरा यशस्वी करण्यात आणि त्यांना उत्तरेतही स्वीकारले जात आहे, राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्याप्रमाणे नाकारले जात नाही. अशा पद्धतीने त्यांचे राष्ट्रीय ब्रँडिंग करण्यातही संजय राऊत यांच्या या नियोजनामुळे नक्कीच शिवसेनेला फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षात पत्रकार ते शिवसेना नेते खासदार पक्षप्रमुखांची सल्लागार आणि महाविकास आघाडी सरकारची मोट बांधण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली ते संजय राऊत यांचा हा प्रवास नेमका काय आहे आणि बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेले त्यांचे संबंध आणि निष्ठा याविषयी जाणकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

प्रतिक्रिया

बाळासाहेबांनी का केले जवळ? -संजय राऊत हे लोकप्रभामध्ये पत्रकार होते. लोकप्रभामध्ये संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक मुलाखती छापल्या. या मुलाखती गाजल्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना आपल्या सामना या दैनिकात बोलावले. सामनाचे कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी राऊत यांच्यावर सोपवली. राऊत यांच्या लिखाणाची आक्रमक शैली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे बाळासाहेबांना भावले. शिवसेनेवरील राऊत यांनी दाखवलेली निष्ठा पाहून बाळासाहेबांनी त्यांना राज्यसभेची खासदारकी सुद्धा दिली. संजय राऊत हे त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सोबतही सुर जुळवून घेऊ लागले. मात्र राजकारणात अधिक सक्रिय असलेल्या राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अधिक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि संजय राऊत यांचे सहकारी अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे यांचा राजीनामा राऊतांनी लिहिल्याची चर्चा -शिवसेनेमध्ये संजय राऊत हळूहळू ठाकरे घराण्याचे सल्लागार म्हणून ओळखले जाऊ लागले होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी नाराज होऊन शिवसेनेपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना लिहिलेले पत्र आणि दिलेला राजीनामा हा संजय राऊत यांनी लिहून दिला असल्याचे चर्चा जोरदार रंगली. त्यामुळे राऊत यांच्या निष्ठे विषयी शिवसेनेत दबक्या आवाजात चर्चा होत असली तरी बाळासाहेबांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.

संजय राऊत हे जुळवून घेण्यात पटाईत -संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर सोयीस्कररीत्या राज ठाकरे आणि त्यानंतर आपले हित कशात आहे, हे पाहून उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेतले. बदललेल्या राजकीय परिस्थितीत शरद पवार यांच्या सोबत सुरुवातीपासूनच मधून संबंध असलेल्या संजय राऊत यांना महत्त्व आले. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या माध्यमातून महाविकासआघाडीचा पूल बांधला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली.

राऊत यांची निष्ठा बेभरवशाची -संजय राऊत हे शिवसेनेसोबत आहेत, बाळासाहेब ठाकरे नंतर त्यांनी आपण शिवसेनेसोबत कायम आहोत आणि ठाकरे कुटुंबीयांशी आपली निष्ठा कायम असल्याचे म्हटले असले तरी संजय राऊत यांची निष्ठा ही बेभरवशाची आहे. ते सध्या जरी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर भविष्याचा वेध घेऊन आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती बदलल्यास त्यांची निष्ठा बदलू शकते. शरद पवार यांच्याकडे त्यांचा नेहमीच जास्त ओढा राहील, अशी प्रतिक्रिया भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत का? -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अतिशय धुरंधर राजकारणी होते. त्यामुळे त्यांच्या सोबत राहणे, हे राजकीय दृष्ट्या हिताचे असल्याचे राऊत यांना ठाऊक होते. उद्धव ठाकरे हे मवाळ स्वभावाचे राजकारणी असले तरी कुशल संघटक आणि मुत्सद्दी नेते आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणात ते किती काळ राहतील याबाबत शंका असल्याने शिवसेनेची सर्व मदार आणि पुढील राजकीय धुरा ही सर्वस्वी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. हेच संजय राऊत यांनी जोखले असल्यामुळे त्यांनी आता आदित्य यांच्या हनुमानाची भूमिका निभावण्याचा सुरुवात केली असल्याचेही भारतकुमार राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा -Devendra Fadnavis On Ajit Pawar : अजित पवारांविरोधात षड्यंत्र; देहुतील भाषणावरून फडणवीसांचा गौप्यस्फोट

ABOUT THE AUTHOR

...view details