मुंबई :शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेत उभी फूट ( Vertical Split in Shiv Sena ) पडल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे ( Shiv Sena Rebellious MLA ) पक्षाचे मोठे नुकसान ( Great Loss to The Party ) होत आहे. पाठीत खंजीर खुपसणारे शिवसैनिक केव्हाच होऊ शकत नाहीत. ज्यांना पक्षामुळे सर्वकाही मिळाले, तेच आज गद्दारी करीत आहे. खरा शिवसैनिक असे कधीच करू शकणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी बंडखोर आमदारांवर चढवला. तसेच वेळ आली तर बाळासाहेबांचा शिवसैनिक ( Balasaheb Shiv Sainik ) भगवा खिशात आणि दांडा बाहेर काढेल, असा धमकीवजा इशारा दिला. दहिसर ( Shiv Sena meeting at Dahisar ) येथील शिवसेनेच्या मेळाव्यात राऊत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बंडखोर आमदारांविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर : नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५२ आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. राज्यभर बंडखोर आमदारांबद्दल तीव्र निदर्शने केली जात आहेत. कुणाची कार्यालये फोडली जात आहेत. राज्यात बंडखोरांच्या विरोधात आता शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहे. त्यांची भूमिका ही पक्षाला शोभणारीच आहे. खऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेब यांची शिकवण आहे. त्यामुळे खांद्यावर असलेला भगवा तो खिशात ठेवून दांडा बाहेर काढेल आणि मग बंडखोरांबाबत काय होऊ शकते याचे संकेतच राऊतांनी दिले. तसेच, आतापर्यंत चर्चेपर्यंत असलेला विषय आता रस्त्यावर उतरण्यापर्यंत येऊन ठेपल्याचे राऊत यांनी सांगितले. एकंदरीत बंडखोरामुळे शिवसैनिकावर आणि पक्षावर काहीही परिणाम होणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.