महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Political crisis in Maharashtra : बंडखोर आमदारांपैकी एकही आमदार निवडून येणार नाही - जयंत पाटील - Union Minister Narayan Rane

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच धनुष्यबाण हा महाराष्ट्रातला एक ब्रँड ( CM Uddhav Thackeray ) आहे. शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shinde ) यांच्यासह ज्या चाळीस आमदारांनी बंडखोरी ( Shiv Sena rebels MLA ) केली. या बंडखोर आमदारांना भविष्यात निवडूनही येता येणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Nationalist Congress ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे.

Jayant Patil
जयंत पाटील

By

Published : Jun 24, 2022, 10:16 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच धनुष्यबाण हा महाराष्ट्रातला एक ब्रँड ( CM Uddhav Thackeray ) आहे. शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shinde ) यांच्यासह ज्या चाळीस आमदारांनी बंडखोरी ( Rebel MLA ) केली. या बंडखोर आमदारांना भविष्यात निवडूनही येता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Nationalist Congress ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP Jayant Patil) यांनी व्यक्त केले आहे. तसेच शिवसेना ( Shiv Sena ) पक्षाची कार्यपद्धती ही वेगळी आहे. कार्यपद्धतीबाबत सर्व कार्यकर्ते नेत्यांना अवगत आहे. तरीही पक्ष अध्यक्ष बाबत काही नाराजी असल्यास तशी त्यांनी पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करायला हवी होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांना त्यांनी हा इशारा दिला आहे.



राणेंच्या विधानांना महत्त्व देत नाही -शिवसेनेचे बंडखोर आमदार ( Shiv Sena rebels MLA ) सध्या गोहाटीत आहेत. तसेच शिवसेनेने महाविकास आघाडी तून बाहेर पडण्याचा इशारा त्यांच्या कडून दिला जातो. मात्र, बंड पुकारलेले आमदारांना शेवटी मुंबईतच यावे लागेल. विधानसभेच्या रणांगणात या सर्व आमदारांना उतरावे लागेल. तेथे त्यांना आसाम किंवा गुजरातचे भाजप नेत्यांचे मार्गदर्शन भेटणार नाही, असा इशारा शरद पवारांनी दिला होता. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी पवार हे बंडखोर आमदारांना धमकी देत असल्याचे म्हणत त्यांना ही घरी जाणे कठीण होईल असे ट्विटच्या माध्यमातून म्हटले. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, नारायण राणे यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गांभीर्याने घेत नाही. तसेच नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी वापरलेली भाषा आम्हालाही वापरता येते असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

सरकार अल्पमतात नाही -
बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढलेला नाही. शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी अध्याप सरकारचा पाठिंबा काढलेला नाही. अजूनही त्यांच्याकडून आपण शिवसेनेतच असल्याचा उच्चार केला जातो. महाविकास आघाडी सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षाचे आहे. त्यामुळे अद्यापही हे सरकार अल्पमतात नसल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details