मुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादर शिवाजी पार्क वरून दसरा मेळाव्याला सुरुवात केली. शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा दरवर्षी घेण्यात येतो. कोरोनाच्या निर्बंधामुळे गेली दोन वर्ष शिवाजी पार्कवर मेळावा झाला नव्हता. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवाजी पार्क दसरा मेळावा Shivaji Park Dussehra Melawa होईल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेत मोठी बंडाळी होऊन दोन गट तयार झाले आहेत. बंडखोर आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केला आहे.
शिवसेना आणि शिंदे गट सामना त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट असा सामना रंगला आहे. विधानभवनातही याचे पडसाद उमटले होते. आता शिंदे गट आणि शिवसेनेतील शिवाजी पार्क मेळावा वरून नवा वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेने शिवाजी पार्क मेळावा घेण्यासाठी पालिकेकडे अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने शिवाजी पार्क मेळावा घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यावर स्पष्टीकरण दिला आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क शिवसेनेचा मेळावा होईल, असा सूचक इशारा दिला आहे. सध्या हे प्रकरण महापालिकडे मंजूरसाठी प्रलंबित असले तरी दोन गटांमधील वाद रंगणार आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरेदसऱ्या मेळाव्यासंदर्भात संभ्रम कोणाचा नाही. तो शिवसेनाचा म्हणजे आमचा होणार. सभ्रम निर्माण करणाऱ्यांनी सभ्रम निर्माण करू द्या. पण शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी केली आहे. शिवसेनेचा मेळावा हा दसऱ्याला होणार. आणि शिवतीर्थावरच होणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी बोलत होते.
काय म्हणाले होते शिंदे गटाचे प्रवक्ते दसरा मेळावा घ्यायचा अधिकार हा आमचा आहे. आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहोत. कारण दसरा मेळावा हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, हे तुम्हाला कळेल, म्हणत त्यांनी दसऱ्या मेळाव्यावर शिंदे गटाने दावा केला आहे. तसेच हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडलेले दसरा मेळाव्यावर दावा सांगत असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले.
मुख्यमंत्री योग्य निर्णय देतील हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे यांनी हे सरकार स्थापन केले आहे. बाळासाहेबांच्या विचारपासून कधीच फारकत घेतली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हा दसरा मेळावा सुरु केला आहे. हा दसरा मेळावा घ्यायचा की नाही याबाबत अजून तरी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला नाही. ठाकरे गटाने परवानगी मागावी. मात्र, या संदर्भात काही परवानगी पाहिजे असेल तर ते देतील. या सर्व प्रकरणामध्ये मुख्यमंत्री योग्य निर्णय देतील, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
हेही वाचा Dussehra gathering शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आमचाच होणार, उद्धव ठाकरेंची घोषणा