महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शरद पवार आणि पाच आश्चर्य !

गेली पाच दशके संसदीय शासन व्यवस्थेत प्रतिनिधीत्व करणारे शरद पवार, हे सध्या राज्यसभेचे खासदार आहे... त्यांच्या या दिर्घकालीन राजकीय कारकिर्दीत असे अनेक प्रसंग घडले आहेत, जे त्यांच्या राजकीय साचेबद्धपणाची साक्ष देतात... अशीच काही आश्चर्य आपण आज पाहणार आहोत...

शरद पवार

By

Published : Sep 30, 2019, 3:26 PM IST

मुंबई - असे म्हटले जाते की, शरद पवारांच्या राजकारणाची खात्री आपल्याला कधीच देता येत नाही. 'पवारांचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल?' याबाबत कोणालाही खात्री देता येणार नाही. याचे कारण, शरद पवार हे नेहमीच त्यांच्या नवनव्या रणनीतीने सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. परंतु त्यांच्या या भूमिका बदलण्याच्या स्वभावामुळे आणि राजकारणात धक्कातंत्राचा वापर करण्याच्या प्रवृत्तीमुळे, त्यांच्या सोबत असणारे लोकही त्यांना, विश्वासघात करणारा राजकारणी किंवा बेभरवशाचा राजकारणी, असे म्हणतात. याला कारणीभूत असे काही प्रसंग शरद पवारांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात.

शरद पवार

हेही वाचा... काँग्रेसने उमेदवारी दिलेले 'हे ' माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा?

पहिला 'विश्वासघात' की, सत्तेचा तिर..!

शरद पवार यांनी 1978 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांना देशभर ओळखले गेले. मात्र त्याही अगोदर एका घटनेमुळे त्यांच्या नावाची देशभर चर्चा झाली होती. ती म्हणजे, १९७८ साली त्यांनी स्वतः सरकारमध्ये मंत्री असलेल्या मुख्यमंत्री, वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुरोगामी लोकशाही दलाचे (पुलोद) सरकार स्थापन केले होते.

नेमकं काय घडलं होतं..?

1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसने (रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस) स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या होत्या. आणीबाणीमुळे इंदिरा गांधींवरील जनतेचा राग कमी झालेला नव्हता. याचा फटका इंदिरा काँग्रेसला बसला, तसाच तो रेड्डी काँग्रेसलाही बसला. परिणामी जनता पक्षाने 99 जागांसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवले आणि इंदिरा काँग्रेसला 62, तर रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. यानंतर मतदानातून राजकीय वास्तव पाहून दोन्ही काँग्रेसने एकत्र सरकार बनवले. त्यावेळी वसंतदादा पाटील, शरद पवार हे रेड्डी काँग्रेसमध्ये होते. समझोता झाल्यानंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री, इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री बनले. यावेळी शरद पवार यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले होते.

पक्षफुटीतून बनलेल्या दोन पक्षांनी एकत्रीत सरकार चालवण्याचा हा प्रयोग राज्यात सुरू असताना त्यांच्यात अंतर्गत धुसफूस वाढत होती. याचा परिणाम म्हणून वसंतदादा सरकारमधून बाहेर पडत 40 आमदार घेऊन शरद पवारांनी काढता पाय घेतला. शरद पवार सरकारमधून बाहेर पडले खरे, मात्र ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या 'समाजवादी काँग्रेस', जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष यांना घेऊन राज्यात पहिले बिगर काँग्रेस सरकार स्थापन केले.

शरद पवार

हेही वाचा... माझ्या काकांनी एका झटक्यात कर्जमाफी केली...अजित पवारांचा विरोधकांना टोला

पुलोदची स्थापना करून शरद पवार वयाच्या 38 व्या वर्षी राज्यातील तरुण मुख्यमंत्री बनले. मात्र पवारांच्या या कृतीने तत्कालीन वसंतदादांचे सरकार पडले. यामुळे 'शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला', असा प्रचार तत्कालीन नेत्यांनी करायला सुरुवात केली. शरद पवारांची प्रतिमा विश्वासघातकी राजकारणी अशी बनवण्यास सुरुवात केली. तसे पाहता पवारांच्या या पुलोदच्या प्रयोगाला यशवंतरांवाचा गुप्त पाठिंबा होता, असे बोलले जाते., मात्र आज इतक्या वर्षांनंतरही पवारांवर असलेला हा शिक्का तसाच कायम आहे.

शरद पवारांची सर्वात मोठी ताकद म्हणजे, आजवर त्यांच्यावर विश्वासघात करणे, साथ सोडणे अशा टीका सतत होत राहिल्या. मात्र त्यांच्या राजकीय आणि लोकप्रियतेच्या मार्गावर या टीका कधी आड आल्या नाहीत. अवघ्या पावणे दोन वर्षे चाललेल्या शरद पवारांच्या पुलोद सरकारने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर दूरगामी परिणाम करणारे निर्णयही घेतले. स्वत: ला एक कुशल, चतुर राजकारणी आणि सक्षम प्रशासक म्हणून त्यांनी सिद्ध केले. शेतकऱ्यांना पहिल्यांदा केलेली कर्जमाफीची घोषणा, शेतमजुरांच्या पगारामध्ये केलेली वाढ, असे काही निर्णय त्यांनी घेतले, जे राज्यातील जनतेला आवडले.

हेही वाचा... रोहित पवारांबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

पवारांचा आणखी एक धक्का ... काँग्रेस वापसी

शरद पवार यांनी आपल्या राजकारणात आणखी एक मोठा धक्का तेव्हा दिला, जेव्हा त्यांनी त्यांचा समाजवादी पक्ष इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला. 1978 ला वसंतदादा सरकारमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या सोबत आलेल्या अनेक सहकाऱ्यांसोबत मिळून 'समाजवादी काँग्रेस' पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी पवारांसोबत शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे, सदानंद वर्दे, भाई वैद्य यांच्यासारखे नेतेही होते. मात्र इंदिरा काँग्रेसला विरोध करत वसंतदादा सरकारमधून बाहेर पडलेल्या पवारांनी 1985 साली जेव्हा इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर आपला समाजवादी काँग्रेस मुळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे ठरवले, तो पर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या अनेकांना या गोष्टीची कल्पनाही नव्हती. यामुळे सोबतच्या सहकाऱ्यांनाही 'ताकास तूर लागून न देणारा, धुर्त राजकारणी' अशी पवारांच्या सहकाऱ्यांची मते येत होती.

शरद पवार

तसे पाहता इंदिरा गांधी आणि त्यांच्या राजकारणावर टीका करणारे शरद पवार हे इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर देशात आलेल्या सहानुभूतीच्या लाटेतही राज्यात शरद पवारांच्या काँग्रेस (s) ची कामगीरी चांगली होती. पण राजकारणाच्या पाच पावले पुढे जात विचार करणाऱ्या, पवारांनी आपल्या मुळ शैलीला अनुसरून तडक निर्णय घेत, आपला पक्ष काँग्रेसमध्ये सामिल करण्याचे ठरवले.

हेही वाचा... ईडीने पवारांना नोटीस दिलीच नव्हती; अर्थमंत्री मुनगंटीवारांचा खुलासा

खरे तर 1978 च्या पुलोद सरकारच्या प्रयोगानंतर महाराष्ट्राचा जनतेतही शरद पवार हे, आंध्रप्रदेशचे नेते एन. टी. रामाराव यांच्या सारखे इंदिरा विरोधी राजकारण करत एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून उदयास येतील, असे वाटले होते. काँग्रेसला एक आव्हान म्हणून ते उभे राहतील अशी अपेक्षा होती. मात्र पवारांच्या योजना वेगळ्या होत्या. कारण इंदिरा काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर पवार हे पुढील १२ वर्षे काँग्रेसमध्ये राहिले. या दरम्यान ते दोनदा मुख्यमंत्री झाले आणि नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये दिल्लीत केंद्रीय मंत्रीही झाले.

1978 ची पुनरावृत्ती

शरद पवारांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे 1999 ची राष्ट्रवादी काँग्रेसची केलेली स्थापना. 1999 मध्ये पवार यांनी 1978 प्रमाणे सरकारमधून बाहेर पडत नव्या पक्षाची स्थापना केली. 1998 साली पवार हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी पवार हे सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पुनरागमनासाठी स्वतः प्रयत्नशील होते. मात्र काही कालावधीनंतर काँग्रेस अंतर्गत सोनिया यांचे वाढते प्रस्थ पाहता ते अस्वस्थ झाले होते. यातच 1999 ला ते काँग्रेसकडून स्वतः पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र सोनिया गांधी यांचे नाव पुढे येऊ लागल्याने त्यांनी, ' सोनिया यांचे मुळ परदेशी असण्याचा मुद्दा' पुढे करत काँग्रेसला रामराम ठोकला. यानंतर आपण पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाही, हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी 25 मे 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना केली.

शरद पवार

हेही वाचा... MAHA VIDHAN SABHA : 'बाबरी'नंतर हिंदूत्ववादी राजकारण.. मुंबई बॉम्बस्फोट मालिका अन् मराठवाडा नामांतर आंदोलन​​​​​​​

शरद पवार हे तसे, त्यांच्या पुरोगामी आणी प्रगतशील विचारांसाठीच ओळखले जातात. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि वैज्ञानिक स्वभाव असणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. ते कधीही कोणत्याही मंदिरात जात नाही. आपल्याला पहिले अपत्य मुलगी असूनही त्यांनी दुसरे मूल होऊ न जाणीवपूर्वक निर्णय घेतला. म्हणूनच, त्यांनी सोनिया गांधी यांच्या भारतीय नसल्याचा मुद्दा उपस्थित करणे हे अनेकांना आवडले नाही.

2004 साली युपीएत सामिल

ज्या काँग्रेसची साथ शरद पवारांनी 1999 ला केंद्रात सोडली त्याच काँग्रेससोबत राज्यात 1999 ला आघाडी करत पवारांनी सरकार स्थापन केले. तर 2004 ला काँग्रेस प्रणीत पुरोगामी लोकशाहीच्या आघाडीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाली होता. यानंतर आघाडीत सहभागी होताना त्यांनी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हायचे असेल तर ते होऊ शकतात, असे बोलूनही दाखवले. मात्र बाण अगोदरच निसटलेला होता. 2004 ते 2009 असे पुढील 10 वर्षे ते आणि त्यांचा पक्ष केंद्रात सत्तेत भागीदार झाला. या दरम्यान पवार केंद्रात कृषीमंत्री होते.

पवारांचे राजकीय चातुर्य पण अपयश...

2014 हे वर्ष राज्यातील अनेक पक्ष आणि नेतृत्वासाठी महत्वाचे ठरले. याचे कारण केंद्रात आलेल्या मोदी लाटेनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवल्या. यावेळी लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही राष्ट्रवादीला मोठा पराभव स्विकारावा लागला. तसेच राष्ट्रवादीचे संख्याबळ 2009 च्या तुलनेत घटून ते 41 वर आले. भाजपला प्रचंड यश मिळाले (123 जागा) पण सत्ता स्थापनेसाठी आवश्यक ते संख्याबळ मात्र मिळू शकले नाही. अशा वेळी पवारांनी आपले राजकीय चातुर्य दाखवत भाजपला सरकार स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा देऊ केला. तत्पुर्वी विधानसभा वेगवेगळ्या लढवलेले सेना भाजप यांत युती होण्याची शक्यता कमी होती. अशावेळी राष्ट्रवादीने सरकारला बाहेरून पाठिंबा देत, भाजपला आपल्यावर अवलंबून ठेवून, पक्षातील लोकांचे हितसंबंध जोपासने असा विचार केल्याचे दिसते.

शरद पवार

हेही वाचा... 'माझ्यावरील कारवाईमुळे अस्वस्थ होऊन अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा'​​​​​​​

..... मात्र तसे घडले नाही, इथे पवारांच्या राजकीय खेळीला भाजपने शह दिला.

भाजपने पवारांना मागे टाकले. एकीकडे सरकार स्थापन केले, तर दुसरीकडे शिवसेनेकडे मैत्रीचा हात पुढे केला. यानंतर काही दिवसांत शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला. यामुळे अनेक वर्षे राजकारणात फ्रंट फुटवर खेळणारे पवार, प्रथमच बॅकफूटवर गेले. यानंतरही गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपने अनेक आघाड्यांवर पवारांना धारेवर धरले.

पवारांच्या तत्कालीन राजकीय खेळीची कारणमिंमासा

2014 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर, प्रामुख्याने अजित पवार यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते. त्यातील प्रमुख दोन मुद्दे होते. एक म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा आरोप आणि दुसरा सिंचन कराराच्या वाटपात घोटाळा केल्याचा आरोप. या आरोपांची धार कमी करण्यासाठी पवारांनी ती खेळी केली असावी, असे म्हटले जाते. मात्र भाजपने गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाबाबत न्यायालयीन खटले किंवा चौकशींना कधीच रोखले नाही.

शरद पवारांच्या राजकीय अनुभवाच्या कसोटीचा काळ...

गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीचे सुमारे 15 ते 20 लोकसभा व विधानसभा आजी, माजी सदस्य भाजपमध्ये गेले आहेत. त्यांपैकी बहुतेक हे सहकारी साखर कारखाने किंवा बँका किंवा इतर काही संस्थांशी संबंधित आहेत. असे म्हटले जाते की, या सर्वांचे असे काही हितसंबंध गुंतलेले आहेत, अन्यथा त्यांपैकी काहींनी पक्ष सोडला नसता.

शरद पवार

शरद पवार यांनी यापूर्वी पक्षातून अशा प्रकारची फूट केव्हाच पाहिली नव्हती. यामुळे आज ज्या प्रमाणात पक्षात फूट होतेय अथवा पक्ष सोडून जाण्याच्या घटना होत आहेत, यामुळे शरद पवार काही प्रमाणात हादरून गेल्याचे दिसत आहेत. पवार हे तसे दाखवत नसले तरी, या गोष्टींमुळे पक्षाची ताकद अतिशय कमी झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाची ताकद बरीच कमी झाली आहे. प्रामुख्याने छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि इतर चार मुख्य नेत्यांच्या जाण्याने त्यांच्या पक्षाची ताकद बरीच कमी झाली आहे.

हेही वाचा... लातूरकरांच्या आठवणीतली 'मामुली' निवडणूक; विलासरावांनाही पत्करावा लागला होता पराभव​​​​​​​

तसेच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आजपर्यंत एका अपवादाशिवाय शरद पवार यांची कधीही चौकशी झाली नव्हती किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र अजित पवार यांचे नाव असलेल्या शिखर बँक घोटाळ्यात त्यांचेही नाव गोवले गेल्यामुळे त्यांना अथवा अजित पवार यांना ईडीसारख्या संस्थेकडून चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. आज संपूर्ण देशभरात भाजप अनेक यंत्रणांच्या सहाय्याने राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी ज्या पद्धतीने व्यवहार करीत आहेत, त्यामुळे पवार हतबल झाले आहे. त्यांनी ही हतबलता त्यांनी अनेकदा व्यक्त करूनही दाखवली आहे.

काही दिवसापूर्वीच शिखर बँक प्रकरणात शरद पवार ईडी रडारवर असू शकतात, अशी माहिती मिळाली होती. यावेळी़ पवार यांनी घेतलेला पवित्रा पाहता, आपले जनमानसातील स्थान काय आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. तसेच या प्रकरणात त्यांनी आपण राजकारणात अजुनही किती पुढे आहोत, हेही दाखवून दिले. पण यानंतर अजित पवारांचा राजीनामानाट्य यामुळे पवारांपुढे अनेक नवीन प्रश्न उभे ठाकले आहेत. अजित पवारांच्या प्रकरणाला कौटुंबीक रंग देण्याचा प्रयत्न करत त्यांनी यावर पडदा टाकण्याच प्रयत्न केला., मात्र पक्षांतर्गत समस्या डोके वर काढत असल्याचे यातून दिसून आले आहे.

शरद पवार

हेही वाचा... सुप्रियांच्या पहिल्या निवडणुकीतील मदतीची राष्ट्रवादीकडून 'अशी' होणार सेनेला परतफेड?​​​​​​​

शरद पवार यांच्या सोबत सध्या सर्व काही ठिक होत आहे, असे दिसत नाही. पंतप्रधान मोदी, अमित शाह तसेच राज्यातील अनेक नेते फक्त शरद पवारांवरच टीका करताना दिसत आहेत. एक वेळ स्वतःला पवारांचे शिष्य म्हणवणारे मोदी देखील त्यांच्यावर टिका करताना मागे पुढे पाहत नाहीत. हीच तऱ्हा राज्यातही आहे. यामुळे शरद पवार सध्या राजकारणाच्या एका गर्तेत पडल्याचे दिसत आहेत. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना पवार साहेब यातूनही मार्ग काढतील, अशी आशा आहे. पवारांचा राजकीय इतिहास पाहता ते अशक्य आहे., असेही म्हणता येणार नाही. यामुळे लेखाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, आपल्याला एका गोष्टीची खात्री असालया हवी की, शरद पवारांची पुढची चाल काय असेल ? हे कोणीही कधीही सांगू शकत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details