महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्वीगी, झोमॅटोच्या नावाचा वापर करून फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - Police take action Swigi and Zomato for city riding

स्वीगी, झोमॅटो या जेवणाचे पार्सल देणाऱ्या कंपनीचे नाव वापरून डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून शहरात भटकंती करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. असे अनेकजण मुंबईत भटकताना आढळले होते.

swigi-and-zomato-for-city-riding
स्वीगी, झोमॅटोच्या नावाचा वापर

By

Published : Apr 27, 2020, 5:11 PM IST

मुंबई - मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील जुहू परिसरात डीएन नगर पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. स्वीगी, झोमॅटो या जेवणाचे पार्सल देणाऱ्या कंपनीचे नाव वापरून डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून शहरात भटकंती

बाईकवर जाणाऱ्या खोट्या नावाचा वापर करून डिलिव्हरी बॉयवर कारवाई करताना त्यांची टी-शर्ट काढायला लावले, तसेच बाईक वर आपत्कालीन मदत असे लावलेले स्टिकर पोलिसांनी जप्त केले आहेत. या शिक्षा करणाऱ्या बाईक चालकांना हा शेवटचा इशारा असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details