मुंबई -मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून मुंबईकरांना रविवारच्या दिवशी फिरण्यासाठी आणि सायकल इन स्केटिंग क्रिकेट खेळण्यासाठी संडे स्ट्रीट ही संकल्पना सुरू केली होती. 27 मार्च पासून सुरु केलेल्या संकल्पनेनंतर या संकल्पनेला मुंबईकरांनी ( Mumbai Sunday Street ) चांगला प्रतिसाद दिला होता. आज (रविवारी) मुंबईतील रफी अहमद किडवई मार्ग ( Rafi Ahmed Kidwai Marg ) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब कुळे ( Police Sub-Inspector Dadasaheb Kule playing flute ) यांनी बासरीचे सुरेल वादन केले. दादासाहेब कुळे यांच्या आत लपलेले कलाकार बाहेर आले आणि त्यांनी बासरीच्या तालावर बॉर्डरचे गाणे वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
मुंबई पोलिसांकडून दर रविवारी संडे स्ट्रीट कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याच्या आतील कलाकार बाहेर आला. यानंतर त्यांनी जे केले त्यामुळे सर्वच जण मंत्रमुग्ध झाले. दादासाहेब कुळे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवेत आहेत. संडे स्ट्रीट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दादासाहेब कुळे यांच्या आत लपलेला कलाकार बाहेर आला आणि त्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.