महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis: ठाण्यातल्या तिन्ही बंडखोर आमदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला - Rebel MLA Eknath Shinde

शिवसेनेच्या ठाण्यातल्या तीनही बंडखोर आमदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला ( Police stepped up outside rebel MLAs house ) आहे. एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shinde ) , प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आणि एस. आर. पी. एफ.च्या तुकड्या त्यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

Police stepped up outside
Police stepped up outside

By

Published : Jun 26, 2022, 4:44 PM IST

ठाणे - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर आता राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर ( Law And Order Situation In Maharashtra ) झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाण्यातल्या तीनही बंडखोर आमदार एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shinde ) , प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला ( Police stepped up outside rebel MLAs house ) आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आणि एस. आर. पी. एफ.च्या तुकड्या ( Police and SRPF units stepped up ) त्यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर शंभर पोलिसांचा बंदोबस्त -कालपर्यंत 40 पोलिसांचा बंदोबस्त असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर आज जवळपास शंभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करम्यात आला आहे. बंगल्याबाहेर आणि कंपाऊंडच्याबाहेर ही अनेक शंभर पोलीस आता बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून पुढील काही दिवस तरी हा पोलीस फौज फाटा बंगल्याच्या संरक्षणासाठी असणार आहे हे निश्चित.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis: शिंदे समर्थनार्थ ठाण्यातला पहिला राजीनामा; ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केंनी सोडले जिल्हाप्रमुख पद

रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईकांच्या घराबाहेर देखील बंदोबस्त -शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि रविंद्र फाटक या दोघांच्या घराबाहेर देखील पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून आता जागता पहारा दिला जाणार आहे. एकनाथ शिंदेंसोबत असल्याने शिवसनेचे अनेक कार्यकर्ते रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांच्यावर नाराज आहेत. त्यांच्याघराबाहेरही शिवसैनिक आक्रमक होऊ नयेत यासाठी ही व्यवस्था करण्यता आली आहे.

हेही वाचा -Rashmi Thackeray in Action : रश्मी ठाकरे उतरल्या मैदानात, निवडक आमदारांच्या पत्नीशी संपर्क

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तांतर होणार अशा काही घटना घडत आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात वातावरण तापले आहे. राज्यभरात विविध ठिकाणी या आमदारांविरोधात निदर्शने सुरू झालेले आहेत. चौकचौकात मोर्चे निघत आहेत. एकनाथ शिंदेंविरोधात जोरदार घोषणबाजी पहायला मिळत आहे. बंडखोर आमदार, नेते यांचे पोस्टर जाळले जात आहेत. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याच्या आधी पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : गरज पडल्यास शिवसैनिक दांडा हातात घेतील

ABOUT THE AUTHOR

...view details