मुंबई - देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते. या घटनेत ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरते. जन्मदात्यांनी चिमुकलीला नाल्यात फेकले. अर्थात मरण्यासाठीच, पण एका मांजराने या बाळाचा जीव वाचवला. घाटकोपर पोलीस ठाण्याहद्दीत हे नवजात स्त्री अर्भक सापडले (abundant child) आहे. या अर्भकाची प्रकृती उत्तम आहे. देखभालीसाठी बाळाला रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेची घाटकोपर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी (mumbai police) सांगितले. दरम्यान, एका मांजरामुळे या बालकाचा जीव वाचल्याची रंजक कहाणी समोर आली आहे.
घाटकोपरच्या रमाबाई नगर परिसरातील एका नाल्यात अज्ञात व्यक्तीने एका नवजात बालकाला (abundant child) फेकून दिले होते. पंतनगर पोलिसांना याची माहिती मिळताच, पोलिसांनी तत्काळ या बालकाला नाल्यातून बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात (rajawadi hospital) दाखल केले. सध्या या बालकाची प्रकृती चांगली असून पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.
मांजरामुळे लागला शोध
शेजारच्या घरातील मांजराने नाल्यात गोंधळ घातला होता. मांजराने नाल्यात का गोंधळ घातला आहे, हा प्रश्न सर्वांना पडला होता. नेमके काय झाले आहे हे बघण्यासाठी गेले असताना संबंधित बाळ कापडात गुंडाळलेले दिसून आले. मांजराने गोंधळ घातला नसता तर कदाचित बाळ सापडले नसते. त्यामुळे मांजराने या बालकाचा जीव वाचविल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मुंबई पोलिसांनीही मांजरामुळे बाळाची माहिती मिळाल्याचे ट्विट केले आहे.
असे मिळाले बालक पोलिसांना
रमाबाई नगर येथील सुरेश रणपिसे यांच्या घराजवळ असलेल्या नाल्यात एका बालकाचा रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी तत्काळ नाल्यात जाऊन पाहिले असता, एका कपड्यात हे नवजात बालक गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांना मिळून आले. त्यानुसार त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पंतनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि त्यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बालकाला ताब्यात घेऊन, राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून बालकाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे.
हेही वाचा -MURDER : औरंगाबादेत तरुणाचा खून, आईच्या तक्रारीवरुन गुंडाविरोधात गुन्हा दाखल