महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हैदराबाद पोलिसांची कारवाई योग्य; मात्र, प्रकरणाची चौकशी व्हावी - एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर पठाण - समशेर खान पठाण

हैदराबाद बलात्कार प्रकरणी पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर संदर्भात मुंबई पोलीस खात्यातील माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी व एकेकाळचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर खान पठाण यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

police officer samsher khan pathan
एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर पठाण

By

Published : Dec 6, 2019, 12:47 PM IST

मुंबई - हैदराबाद बलात्कार प्रकरणी पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर संदर्भात मुंबई पोलीस खात्यातील माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी व एकेकाळचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर खान पठाण यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर पठाण

1990 च्या दशकात सुहास भाटकर (पोत्या गँग) व आसिफ बाटला या कुख्यात गुंडांना यमसदनी पाठवणाऱ्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर खान पठाण यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची गरज असल्याचे म्हटले आहे.

यासोबतच कायदा हातात घेण्याचा पोलिसांना अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रकरणांमध्ये स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य असते, असे ते म्हणाले.

उन्नाव प्रकरण व निर्भया बलात्कार प्रकरणी लवकर न्याय मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. त्याला अनुसरून निर्भया कांडातील आरोपींना तात्काळ राष्ट्रपतींनी आदेश काढून फाशी द्यावी, अशी मागणी माजी पोलीस अधिकारी समशेर पठाण यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details