मुंबई -औरंगाबादच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे ( Notice to mns party workers news ) उतरवण्यासंदर्भात ४ मे पर्यंत अल्टिमेटम दिले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या अक्षय तृतीया असल्याने उद्या राज्यभर मनसेतर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. परंतु, या अगोदरच राज ठाकरे यांच्या आवाहनाने वातावरण तापलेले आहे. त्यातच उद्या मुस्लीम धर्मीयांचा ईद हा सण असल्याकारणाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांकडून ( Police notice to MNS party workers before Maha Aarti ) मुंबईमध्ये मनसे कार्यकर्त्यांना कलम 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा -Gold Silver Price Today : अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंधेला सोनं-चांदी स्वस्त; वाचा आजचे दर
महआरतीवरून तेढ निर्माण होऊ शकतो - राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेसाठी याअगोदरच अनेक मुस्लीम संघटनांकडून विरोध होताना दिसला होता. तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पुन्हा एकदा भोंग्याचा उल्लेख करत ४ मे पर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. अन्यथा प्रत्येक भोंग्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष करून उद्या राज्यभर महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. अक्षय तृतीया असल्याकारणाने या पद्धतीने महाआरतीचे आयोजन करण्यात येत असल्याचे मनसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, उद्या मुस्लीम धर्मीयांचा ईद हा सण असल्याकारणाने यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना 149 च्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मनसे नेते अमित ठाकरे स्वतः प्रभादेवी येथील महाआरतीमध्ये सामील होणार आहेत.
महाआरतीसाठी पालिकेची परवानगी -महाआरतीसाठी मनसेने महानगरपालिकेची परवानगी घ्यावी, असेही सांगण्यात आलेल आहे. वास्तविक पाहता या परवानगीवरून सुद्धा आता वाद निर्माण होऊ शकतो. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिका अशी परवानगी देणार नाही, हे स्पष्ट आहे. भाजपच्या पोल-खोल सभेसाठीसुद्धा महानगरपालिकेने परवानगी नाकारल्याने अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीमध्ये या मागणीवरून सुद्धा तणाव निर्माण होण्याची चिन्हे नाकारता येत नाही.
हेही वाचा -चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई करा- आम आदमी पक्ष