महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ambani Threat Case मुकेश अंबानींना धमकी देणारा अवघ्या काहीच तासात मुंबई पोलिसांच्या अटकेत - अंबानींना धमकी

रिलायन्स हॉस्पिटलचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी Reliance Hospital Mukesh Ambani यांना रिलायन्स रुग्णालयाच्या लँडलाईनवर कॉल करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी Death threat to Mukesh Ambani दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कंबर कसत आरोपी विष्णू भौमिक Vishnu Bhowmik वय 56 याला बोरिवली पश्चिम येथून ताब्यात घेतले.

Ambani Threat Case
Ambani Threat Case

By

Published : Aug 15, 2022, 7:51 PM IST

Updated : Aug 15, 2022, 9:14 PM IST

मुंबई गिरगावातील रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाला Reliance Foundation Hospital Girgaon आज सकाळी साडेदहा ते बारा वाजण्याच्या सुमारास धमकीचे दहा दहा मिनिटांनी एकूण आठ वेळा कॉल आले. या कॉलवरून समोरच्या व्यक्तीने मी अफजल बोलत असून धीरूभाई अंबानी Dhirubhai Ambani यांचा नावाचा उल्लेख एक वेळा केला. नंतरच्या कॉलमध्ये प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स हॉस्पिटलचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी Reliance Hospital Mukesh Ambani यांना रिलायन्स रुग्णालयाच्या लँडलाईनवर कॉल करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी Death threat to Mukesh Ambani दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कंबर कसत आरोपी विष्णू भौमिक Vishnu Bhowmik वय 56 याला बोरिवली पश्चिम येथून ताब्यात घेतले.

पोलिसांचा तपास सरूआरोपीने असे कृत्य का केले याबाबत डीबी मार्ग पोलिस स्टेशन तपास करत आहेत. तसेच या प्रकरणाचे अँटीलिया स्फोटक प्रकरणाशी Antilia Explosive Case धागेदोरे जुळले आहेत का? याचा तपास पोलीस करत असल्याचे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. आरोपीचे दक्षिण मुंबईत ज्वेलरीचे दुकान असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एटीएस सुद्धा चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचाIndian Independence Day टांझानियातील किलीमांजरो शिखरावर साजरा झाला आझादी का अमृत महोत्सव

आरोपीने येथून मिळवला नंबरआरोपीने गुगल वरून रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाचा लँडलाईन नंबर शोधला आणि त्यावर धमकीचे कॉल केल्याची माहिती परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी दिली. आरोपीने त्याच्या मोबाईल क्रमांकावरून हा धमकीचा कॉल केला होता त्यानंतर मुंबई पोलिसांनी हा क्रमांक ट्रेस करून आरोपीचे लोकेशन मिळवले आणि आरोपीला बोरिवली पश्चिम येथून ताब्यात घेतले.

हेही वाचाIndependence Day स्वातंत्र्यदिनी रॅली काढत दावते इस्लामिक हिंद संघटनेचा १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प

Last Updated : Aug 15, 2022, 9:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details