महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कंगना रणौत विरोधात मुंबईत पोलीस तक्रार; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी - देशद्रोहाचा गुन्हा

कंगना रणौत यांनी केलेल्या वक्तव्याचा सोशल मीडियात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून अनेकांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. आपच्या मुंबई प्रभारी प्रीती शर्मा मेनन यांनी विधानाची दखल घेत 504, 505 व 124 A या कलमांखाली देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

police complaint against Kangana Ranaut in Mumbai; made demand by writing letter to CM
कंगना रणौत विरोधात मुंबईत पोलीस तक्रार; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी

By

Published : Nov 12, 2021, 3:16 AM IST

Updated : Nov 12, 2021, 7:03 AM IST

मुंबई - कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत आली आहे. यावेळी तिने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य वरून देशासाठी शहीद झालेल्या शेकडो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान केला आहे. कंगनाच्या विरोधात राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहेत. आम आदमी पार्टीने तिच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही पत्र लिहून देशद्रोही विधान करणाऱ्या कंगना रनौत हिचा पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा असे पत्र केंद्र सरकारला द्यावे, अशी विनंती आम आदमी पार्टीच्या प्रीती मेमन शर्मा यांनी केली आहे.

प्रीती शर्मा यांचे ट्वीट

गुन्हा नोंद करण्याची केली मागणी -

कंगना रणौत यांनी केलेल्या वक्तव्याचा सोशल मीडियात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून अनेकांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. आपच्या मुंबई प्रभारी प्रीती मेनन यांनी विधानाची दखल घेत 504, 505 व 124 A या कलमांखाली देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

काय म्हणाली कंगना रणौत ?

"ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती आणि जे स्वातंत्र मिळाले आहे, ते 2014 मध्ये मिळाले आहे," असे वादग्रस्त वक्तव्य एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीतील कार्यक्रमात कंगना रणौतने म्हटले आहे. या वक्तव्यानंतर देशभरामध्ये चीड निर्माण झाली आहे.

तिचा पद्म पुरस्कार काढून तत्काळ घ्यावा -
तिचा पद्म पुरस्कार काढून तत्काळ घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आपण राष्ट्रपतींकडे करणार असल्याचेही निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनीही कंगनाचा व्हिडिओ ट्वीट करत अशा विचारांना 'वेडेपणा म्हणावा की देशद्रोह' असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा -स्वातंत्र्यासारख्या विषयावर बोलण्याची कंगना रणौतची औकात आहे का? - शेट्टी
हेही वाचा -कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पद्मश्री परत घ्यावा - नीलम गोऱ्हे

Last Updated : Nov 12, 2021, 7:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details