महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या पिता-पुत्राला अटक - mumbai police

या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी यावर कारवाई करीत जशन मुनवानी व जय मुनवानी यांना अटक केली आहे.

मुंबईत वाहतूक पोलिसाला मारहाण

By

Published : Apr 14, 2019, 5:24 PM IST

मुंबई - शहरात पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याची गोष्ट मुंबईत सरार्स घडत आहे. अशाच प्रकारचा गुन्हा मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या २ आरोपींना गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईत १२ एप्रिलला ताडदेव ट्रॅफिक चौकीचे पोलीस कर्मचारी सानप हे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करीत असताना अचानक नो एन्ट्रीमधून शिरणाऱ्या वाहन क्रमांक (MH ०१ BY १६२९) या गाडीला त्यांनी अडवले. यादरम्यान कारवाई करीत असताना त्यातील चालक जशन मुनवानी व जय मुनवानी या पिता पुत्रांनी कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली.

मुंबईत वाहतूक पोलिसाला मारहाण

या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी यावर कारवाई करीत जशन मुनवानी व जय मुनवानी यांना अटक केली आहे. या प्रकरणी या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने या दोघांनाही १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठाडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details