मुंबई - पोलिसांनी एका लॅब टेक्निशनला बनावट कोरोना रिपोर्ट दिल्या प्रकरणी अटक केली आहे. हा आरोपी स्वत: कोविड नमुने घेऊन बनावट रिपोर्ट तयार करून देत होता. त्या बदल्यात तो मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव मोहम्मद सलीम मोहम्मद (वय 29 वर्षे) असून तो मालाड मालवणी भागातील रहीवासी आहे.
आरोपी एका खासगी लॅबमध्ये नोकरी करत होता. त्यांने पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान तो स्वता नमुने घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे. तो एका नमुन्यासाठी 1000 रुपये आकारत असल्याचे समोर आले आहे. त्यांने आतापर्यंत 37 लोकांना बनावट रिपोर्ट बनवून दिले आहेत.