मुंबई -गोरेगावमध्ये एका रिक्षा चालकाने रिक्षातील प्रवासी महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. याबाबत त्या तरुणीने ट्विटरद्वारे तक्रार करताच पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. अशोक खरवी (वय 48) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.
रिक्षात अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाला बेड्या हेही वाचा -अहमदनगर घटनेची महिला आयपीएस अधिकाऱ्याकडून होणार चौकशी
गोरेगाव पश्चिम येथे राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने शनिवारी सकाळी आपल्या घराजवळून कॉलेजला जाण्यासाठी रिक्षा पकडली. यादरम्यान (४८.वय) रिक्षाचालक तिच्याकडे अश्लील नजरेने आरशातून पाहू लागला. सुरुवातीला तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, गोरेगाव पश्चिम ते एमटीएनएल सिग्नल यादरम्यान रिक्षाचालक तिच्याकडे पाहून अश्लील वर्तन करू लागला. रिक्षाचालकाचे वर्तन पाहून आणि रिक्षाचा वेग हे सर्व प्रकार पाहून तरुणी प्रचंड घाबरली. तिने तात्काळ रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र, तो रिक्षा वेगात पुढे घेऊन जात होता. त्या तरूणीने रिक्षाच्या क्रमांकासह मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओसह तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसानी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे रिक्षाचालकाला शोधून काढत त्याला बेड्या ठोकल्या. मुंबई शहर व उपनगरात महिला, तरुणी सोबत कोणीही गैर वर्तवणूक केली तर तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना द्यावी, असे आव्हान मुंबई पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा -सरकार मुख्यमंत्री चालवतात की अधिकारी? खासदार संभाजीराजेंचा सवाल