मुंबई - शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
'भारत बंद' : मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज - bharat band agitation in mumbai
शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
!['भारत बंद' : मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज bharat band protest in mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9795927-501-9795927-1607343603457.jpg)
ऑपरेशन 'ऑल आऊट' अंतर्गत 22 तडीपार आरोपीना अटक
मुंबई पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आउट या मोहिमेदरम्यान शहरातील तब्बल 22 तडीपार गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. 4 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान केलेल्या कारवाईदरम्यान 22 तडीपार आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या ऑपरेशन दरम्यान गंभीर गुन्ह्यातील पोलिसांच्या अभिलेखावर असलेले 362 गुन्हेगार तपासण्यात आले असून अमली पदार्थांच्या विरोधात केलेल्या कारवाई दरम्यान 52 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 44 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई शहरात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 48 फरार गुन्हेगारांचा शोध घेत या ऑपरेशन दरम्यान आरोपींना अटक करण्यात आली आहे.