महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 1, 2021, 8:49 AM IST

ETV Bharat / city

पोलिसांनी छापा टाकून तीन बनावट कॉल सेंटरचा केला पर्दाफाश

बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालाड वेस्टच्या लिंक रोड येथे असलेल्या पाम स्प्रिंग बिझिनेस सेंटरमधील कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. येथे काम करणार्‍या लोकांनी सॉफ्टवेअर व इतर विकण्याच्या नावाखाली स्वत: ला गुगलचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. अमेरिकन आणि लाखो इतर परदेशी लोकांची बनावट वस्तू विकून फसवणूक केली जात होती. या कॉल सेंटरमध्ये लोक व्हिएग्रा व इतर लैंगिक औषधे परदेशी लोकांना विकण्याचा व्यवसाय करीत होते.

police action, call center
पोलिसांनी छापा टाकून तीन बनावट कॉल सेंटरचा केला पर्दाफाश

मुंबई - मालाड आणि बांगूर नगर पोलीस ठाण्याकडून त्यांच्या भागातील तीन बनावट कॉल सेंटरमध्ये छापे टाकण्यात आले. या छापेमारीदरम्यान 18 जणांना अटक करण्यात आली. तसेच 45 संगणक हार्ड डिस्क, 14 लॅपटॉप, 28 मोबाइल, राउटर व इतर साहित्य जप्त केले आहे. कॉल सेंटर चालक स्वत:ला गूगलचा अधिकृत प्रतिनिधी सांगून अमेरिकन लोकांची फसवणूक करीत होता. तर इतर दोन कॉल सेंटरमध्ये बनावट अमेरिकन व्हिएग्रा आणि इतर लैंगिक औषधे विकत होते.

पोलिसांनी छापा टाकून तीन बनावट कॉल सेंटरचा केला पर्दाफाश..

झोन 11चे डीसीपी विशाल ठाकूर यांना विशेष सूत्रांनी मालाड व बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तीन अवैध कॉल सेंटरची माहिती दिली. त्याच्या आधारे बुधवारी रात्री उशिरा दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात छापा टाकण्यात आला, अशी माहिती डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले.

बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालाड वेस्टच्या लिंक रोड येथे असलेल्या पाम स्प्रिंग बिझिनेस सेंटरमधील कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. येथे काम करणार्‍या लोकांनी सॉफ्टवेअर व इतर विकण्याच्या नावाखाली स्वत: ला गुगलचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. अमेरिकन आणि लाखो इतर परदेशी लोकांची बनावट वस्तू विकून फसवणूक केली जात होती. या कॉल सेंटरमध्ये लोक व्हिएग्रा व इतर लैंगिक औषधे परदेशी लोकांना विकण्याचा व्यवसाय करीत होते.

हेही वाचा-सोलापुरात नगरसेविकेने उभारले ऑक्सिजनयुक्त कंटेनर कोविड सेंटर

ABOUT THE AUTHOR

...view details