महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'लाखो रुपयांहून ही भारी एका मताचे मोल....' - धम्मचक्र प्रवर्तन दिना

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक लक्षात घेता यावेळी कवितेच्या माध्यमातून मतदानाबाबत जागृती करण्यात आली.

कवी किरण सोनावणे

By

Published : Oct 9, 2019, 9:04 AM IST

Updated : Oct 9, 2019, 10:10 AM IST

मुंबई - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक लक्षात घेता यावेळी कवितेच्या माध्यमातून मतदानाबाबत जागृती करण्यात आली. 'लाखो रुपयांहून ही भारी एका मताचे मोल' ही कविता सादर करत कवी किरण सोनावणे यांनी उपस्थितांची मने जिंकली.

कवी किरण सोनावणे

हेही वाचा - 'पालकमंत्रीपद काय असते, हे न कळणारी व्यक्ती म्हणजे परिणय फुके'

धम्मचक्र प्रवर्तन दिन बौद्ध धर्मियांसाठी मुख्य दिवस मानला जातो. यावेळी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमातून ईदू मिल, आंबेडकरी समाजाची एकता या विषयावर भाष्य करण्यात आले. विक्रोळी येथील भीम गर्जना मित्रमंडळाने कवी संमेलन आयोजित केले होते. किरण सोनावणे यांनी सादर केलेल्या कवितेने उपस्थितांची मने जिंकली. तर, कवी प्रभाकर रामराजे यांनी ईदू मिलचा रखडलेला विकास कवितेच्या माध्यमातून मांडला. भीम ज्योत या मित्रमंडळाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा इतिहास या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

किरण सोनावणे यांच्या कवितेची कडवी...

पाच पाच वर्षांनी ते होतेय मतदान,
लोकशाही जे जपतील द्या त्यांनाच निवडून,
निर्भयतेने करा मतदान तुमचे मतदान जावे खोल,
लाखों रुपयांहून भारी तुमचे एका मताचे मोल
लक्षात घ्या बंधुनो संविधानाची महती,
देशाचे भवितव्य आहे तुमच्या हाती
पार पाढा जवाबदारी
विचार करून खोल
भारतीयाने ठेवावे ध्यानी भीमरायाचे मोल
लाखो रुपयांहूनही भारी एका मताचे मोल...

Last Updated : Oct 9, 2019, 10:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details