महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पीएमसी बँक; आरोपींच्या वकिलाच्या गाडीवर बँक ग्राहकांचा लाथाबुक्यांनी हल्ला - mumbai

वाधवा यांचे वकील अॅड अमित देसाई यांची गाडी न्यायालयाबाहेर येताच संतप्त बँक ग्राहकांनी त्यांच्या गाडीला अडवून लाथाबुक्क्यांनी गाडीवर हल्ला करत आपला निषेध व्यक्त केला.

पीएमसी बँक

By

Published : Oct 9, 2019, 3:06 PM IST

Updated : Oct 9, 2019, 3:23 PM IST

मुंबई- पीएमसी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज मुंबईतील दिवाणी न्यायालयात एचडीआयएल कंपनीच्या राकेश वाधवा, सारंग वाधवा, पीएमसी बँकेच्या माजी संचालक वारीयमसिंग या तिघांना हजर केले होता. न्यायालयाने तीनही आरोपींना 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीएमसी बँक; आरोपींच्या वकिलाच्या गाडीवर बँक ग्राहकांचा लाथाबुक्यांनी हल्ला

हेही वाचा - येत्या 5 वर्षात सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू - उद्धव ठाकरे

या दरम्यान, वाधवा यांचे वकील अॅड अमित देसाई यांची गाडी न्यायालयाबाहेर येताच संतप्त बँक ग्राहकांनी त्यांच्या गाडीला अडवून लाथाबुक्क्यांनी गाडीवर हल्ला करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गाडी न्यायालयाबाहेर काढून गुंतवणूकदारांना बाजूला सारले.

Last Updated : Oct 9, 2019, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details