नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिक लॉकडाऊनचे नियम पाळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मोदींनी याबाबत ट्विट करुन राज्य सरकारला काही सुचना केल्या आहेत. देशातील नागरिकांना लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यासोबतच जे लोक नियमभंग करत घरातून बाहेर पडतील त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशही राज्य सरकारला दिले आहे.
..अन् मोदी संतापले! म्हणाले, नागरिक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाहीत - बंद
जनता कर्फ्यूला एक दिवस उलटतो न उलटतो तोच नागरिकांमध्ये कोरोनाबाबतचे गांभीर्य हरवले असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेले दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यामुळे नाराज झाले असून त्यांनी ट्विट द्वारे आपला संताप व्यक्त केला आहे.
![..अन् मोदी संतापले! म्हणाले, नागरिक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाहीत narendra modi corona news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6512725-thumbnail-3x2-aa.jpg)
काटेकोरपणे लॉकडाऊन लागू करा, नियमभंग करणाऱ्यांना शिक्षा द्या
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेले लॉकडाऊन अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत असे दिसून येते आहे. ही चिंतेची बाब आहे करोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाउन गांभीर्याने घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एक ट्विट करुन त्यांनी हे आवाहन केले आहे. तसेच सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करा, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.