मुंबई - भारताची गाणकोकिळा दिवंगत लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Dinanath Mangeshkar Award 2022) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जाहीर झाला आहे. येत्या २४ एप्रिलला मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे मोदींना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा हा पहिला पुरस्कार आहे. प्रत्येत क्षेत्रातील दिग्गजांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
Lata Dinanath Mangeshkar Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर
भारताची गाणकोकिळा दिवंगत लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Dinanath Mangeshkar Award 2022) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जाहीर झाला आहे. येत्या २४ एप्रिलला मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे मोदींना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा हा पहिला पुरस्कार आहे.
पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित -अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींना लता दिनानाथ मंगेशकर हा पुरस्कार दिला जाईल. दीदींच्या ओळखीचा आणि दीदींच्या नावाला शोभेल असा पुरस्कारर्थी असायला हवा, अशी मंगेशकर कुटुंबियांची इच्छा होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मोदी लतादीदींना बहीण मानतात. देशाप्रती असलेले नरेंद्र मोदींचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यास त्यांनी अनुकुलता दर्शवली आहे, अशी माहिती उषा मंगेशकरांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
उषा मंगेशकर यांच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार -पुरस्काराविषयी ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले, उषा मंगेशकर यांच्या हस्ते 'लता दिनानाथ मंगेशकर' हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केला जाईल. मनोरंजन, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. आम्ही लतादीदींच्या फोटोला हार घालत नाही, केवळ फुले वाहतो. मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या पुण्यतिथीला 80 वर्षे पूर्ण होत आहेत. लतादीदींच्या सांगितीक कारकिर्दीलादेखील 80 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच 24 एप्रिलला लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा फलक देखील लागणार असल्याचे ते म्हणाले.