मुंबई- भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांची पत्रकार परिषद ‘मौन की बात’ होती, असे ट्विट करत राज ठाकरेंनी केले आहे.
पंतप्रधानांची पत्रकार परिषदेत ‘मौन की बात'; राज ठाकरेंची मोदींवर टीका
पंतप्रधानांची पत्रकार परिषद ‘मौन की बात’ होती, असे ट्विट करत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधानांची पत्रकार परिषदेत ‘मौन की बात
अमित शाह यांनी शुक्रवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. पण त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ही पत्रकार परिषद पक्षाध्यक्षांची असल्याने पक्षशिस्तीनुसार मी उत्तरे देणे योग्य नाही, असे कारण त्यांनी दिले. यावरुन राज ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. “पंतप्रधानांची पत्रकार परिषद...मौन की बात”, असे ट्विट राज यांनी केले.