मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाय योजना संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आढावा बैठक पार पडणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीमध्ये राज्यातील लसीकरणाला गती देण्याबाबतही चर्चा होणार आहे.
पंतप्रधान घेणार राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा; मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक - PM Modi corona situation in Maharashtra
राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाय योजना संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आढावा बैठक पार पडणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होईल.
या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित राहणार आहेत. म्युकरमायकोसिससाठी प्रभावी औषध मिळावे अशी आग्रही भूमीका आपण मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबत राज्यातील ऑक्सिजनबाबतही बोलणार असल्याचे ते म्हणाले.
काही जिल्ह्यांमधील मृत्यूदर वाढला असल्याचे टोपेंनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच कित्येक लोक आजार अंगावर काढत असल्यामुळे, कोरोना झालाय हे कळेपर्यंत उशीर होत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे लोकांनी लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.