महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

PM Modi : यवतमाळमधील तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले लग्नाचे निमंत्रण, मोदींच्या पत्रानं ढोरे कुटुंब भारावले

यवतमाळ जिल्ह्यातील अॅड राहुल ढोरे यांनी आपल्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Congratulatory Message to Newly Married Couple) यांनी नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आशिर्वाद देखील दिले आहेत.

PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Dec 23, 2021, 1:24 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्याला कारणही तसे खास आहे. आर्णीमधील रहिवासी अॅड राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. या पत्राची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली असून नवदाम्पत्याला शुभेच्छांचे पत्र (PM Modi Congratulatory Message to Newly Married Couple) पाठवले आहे.

मोदींच्या नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा

अॅड राहुल ढोरे यांचा विवाह 26 डिसेंबरला दिग्रस तालुक्यातील विटाळा येथील मयुरी माहुरेशी आर्णी येथील महालक्ष्मी संस्कृतिक सभागृहामध्ये 26 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी गोरज मुहूर्तावर नियोजित आहे. राहुल ढोरेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या विवाहाची पत्रिका पाठवली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांनाही वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा एक पत्राद्वारे दिल्या आहेत. आपले निमंत्रण स्वीकार करून परत पंतप्रधान कार्यालयाकडून शुभेच्छाचे पत्र आल्याने ढोरे कुटुंबीयांनी पंतप्रधानांचे मनस्वी आभार मानले.

अॅड राहुल ढोरे यांची लग्नपत्रिका
2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी तालुक्यातील दाभडी येथे 20 मार्च 2014 रोजी शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी चाय पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी लाईव्ह चर्चा केली होती. त्यामुळे देशपातळीवर आर्णी गाव चर्चेत आले होते. त्यामुळेच यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे संबंध निर्माण झाले. म्हणूनच येथील अॅड. राहुल ढोरे (रा. नंदनवन कॉलनी आर्णी) यांनी आपल्या विवाहाची पत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली.

हेही वाचा -Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचे ताजे अपडेट, एका क्लिकवर...

ABOUT THE AUTHOR

...view details