महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 8, 2022, 10:36 AM IST

ETV Bharat / city

Nashik Bus Accident: नाशिक बस दुर्घटनेबाबत पंतप्रधानांकडून शोक.. जखमींना आणि मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर

नाशिक येथील बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी जखमींना आणि मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर असून, (PM help to Nashik Bus Accident) पंतप्रधानांकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे.

Nashik Bus Accident
Nashik Bus Accident

मुंबई: नाशिक येथील बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी जखमींना आणि मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली असून, (PM help to Nashik Bus Accident) पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्वीट करून या बाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधानांकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे.

यवतमाळहून मुंबईकडे जात होती बस:यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्स (Chintamani Travels Yavatmal) कंपनीची ही खाजगी बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास बसचा भीषण अपघात झाला आणि त्यानंतर लागलेल्या आगीमध्ये होरपळून बारा जणांचा मृत्यू झाला. 34 जखमींना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले आहे.

नाशिक बस दुर्घटनेबाबत पंतप्रधानांकडून शोक

पालकमंत्र्यांकडून नातेवाईकांना पाच लाखांची मदत:दरम्यान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा (Rs 5 lakh help in Nashik Bus Accident) केली आहे. तसेच ते चंदिगढ येथील आपला शासकीय दौरा अर्धवट सोडून तेथून त्वरित माघारी फिरलेले आहेत. सध्या ते घटनास्थळी दाखल होण्यासाठी निघाले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश :नाशिक बस दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दुर्घटनेसाठी कोणी जबाबदार असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अमित शाह यांचे ट्विट : या अपघातावर गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट केले आहे. 'नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details