मुंबई -नवाब मलिक यांनी आज हायड्रोजन बॉम्ब स्फोट करणार असं सांगून माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. परंतु त्यांचा हायड्रोजन बॉम्ब हा लवंगी फटाक्याच्या आवाजापेक्षाही कमी होतं असे सांगत नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. भ्रष्टाचाराची नवी व्याख्या त्यांनी समोर आणलेली आहे, असा हल्लाबोल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला.
नवाब मलिक यांच्यावर कारवाई करा - आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद - मुन्ना यादव
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे काही खुलासे केले आहेत ते सर्व तथ्यहीन असून हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे लवंगी फटाके लावू शकले नाहीत. नवाब मलिक यांची यातून हतबलता दिसून येते असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
हाजी अराफत व मुन्ना यादव यांना क्लीनचिट
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे काही खुलासे केले आहेत ते सर्व तथ्यहीन असून हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे लवंगी फटाके लावू शकले नाहीत. नवाब मलिक यांची यातून हतबलता दिसून येते असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांनी हाजी अराफत व मुन्ना यादव यांच्या नावावरून ही देवेंद्र फडवणीस यांना टार्गेट केले आहे. परंतु हाजी अराफत व मुन्ना यादव यांच्यावर एकही आरोप नाही. मुन्ना यादव यांच्यावर एक आरोप आहे पण त्याचे स्पष्टीकरण ते स्वतः करतील. मागील दोन वर्षापासून तुमच्याकडे सत्ता होती. मग ज्यांच्यावर तुम्ही गंभीर आरोप करताय ते हाजी अराफत व मुन्ना यादव यांच्यावर एक साधा गुन्हा का दाखल नाही का? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे. गुन्हेगारांना राजाश्रय हा तुमचा धंदा आहे. असे सांगत कुठलाही गैरव्यवहार फडणीसांच्या काळात झाला नाही. फडणवीस यांच्यावरील आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. ही त्यांची हतबलता आहे. असेही शेलार म्हणाले.
रियाज भाटीचे फोटो अनेक नेते व सेलिब्रिटींसोबत
रियाज भाटी यांचा पंतप्रधान किंवा पंतप्रधान कार्यालय याच्याशी काही संबंध नाही. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये आशिष शेलार यांनी रियाज भाटी यांचे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अस्लम शेख, अभिनेता संजय दत्त, यांच्यासह इतर नेत्यांबरोबर असलेले फोटो दाखवले. फक्त एखाद्याबरोबर फोटो काढणे म्हणजे त्याच्यावर आरोप होत नाही असे सांगत नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे. वाझे प्रकरणात रियाज भाटीचे नाव समोर आल आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने रियाज भाटीला लपवल नाही ना अशी शंका वाटू लागली आहे. असे शेलार म्हणाले.
हेही वाचा -रियाज भाटी हा पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये कसा पोहोचला? नवाब मलिकांचा सवाल