मुंबई -मध्य रेल्वे मार्गावरील संपूर्ण महिला कर्मचारी संचलित असलेल्या माटुंगा रेल्वे स्थानक गुलाबी रंगाने सजला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील 'महिला राज' म्हणून ओळख असलेल्या माटुंगा स्थानकाला गुलाबी रंगाचा साज दिला गेला आहे. यामुळे पर्यटक आणि मुंबईकरांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण झाले आहे. जागतिक महिला दिन हे स्थानक महिलांसाठी पर्वणीच ठरत आहे.
स्थानकातील लाइट देखील गुलाबी
बहुतांश महिलांना गुलाबी रंग आवडतो. गुलाबी रंग नेहमीच महिलांना आकर्षित करतो. म्हणूनच महिलांच्या कामाच्या सर्व वस्तू या गुलाबी रंगाच्या दिसून येतात. त्यामुळे मागील अनेक दिवसापासून येथील भिंती, छ्ताच्या खांबांना गुलाबी रंग देण्याचे काम सुरू आहे. स्थानकातील लाइट देखील गुलाबी करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नकाशावर 'गुलाबी रंगाचे' स्थानक तयार झाले आहे.
हेही वाचा -'मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या संशयानंतरच हत्येचा गुन्हा दाखल'
प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिलांचे फलक
रेल्वे प्रशासनाकडून माटुंगा स्थानकाला गुलाबी रंग देण्याची योजना करण्यात आली आहे. माटुंगा स्थानकातील कार्यालये, फलाट, खांब यांना गुलाबी रंग दिला आहे. विद्युत दिव्यांना गुलाबी रंगाचा पेपर लावून गुलाबी करण्यात आले आहे. शांतीचे प्रतीक असलेल्या बुध्दांची पेंटिंग माटुंगा कार्यालयात साकारण्यात आली आहे. तर, प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी केलेल्या महिलांचे फलक माटुंगा स्थानकात लावण्याची योजना करण्यात आली आहे.