मुंबई -इमारतींमधील अग्निसुरक्षेसाठी विशेष नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर 7 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 2009 मध्ये अग्निसुरक्षेसाठी विशेष नियम जारी करण्यात आले होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
Mumbai High Court : अग्निसुरक्षेसाठी नियमांच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबईमध्ये वाढत असलेल्या आगीच्या घटनांमुळे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे . या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये ( Mumbai High Court ) सुनावणी झाली. यावेळी इमारतीमधील अग्नी सुरक्षेसाठी विशेष नियम असतानाही ते पाळण्यात येत नाही आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
मुंबईमध्ये वाढत असलेल्या आगीचे घटनांमुळे ( Fire Incident ) मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात ( PIL File in Mumbai High Court ) आली आहे . या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी इमारतीमधील अग्नी सुरक्षेसाठी विशेष नियम असतानाही ते पाळण्यात येत नाही आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
मुंबईत इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये ( Fire Incident ) वाढ होत असून अनेक जणांचा मृत्यू देखील होत आहे. तरीही महापालिका तथा राज्य सरकार यासंदर्भात कठोर निर्णय घेत नाही. राज्य सरकारने अधिनियम 2009 मध्ये अग्निसुरक्षेसाठी विशेष नियम संदर्भात जारी केले आहे. ते देखील पाळण्यात येत नाही, असा दावा या जनहित याचिकेत करण्यात आला आहे.