मुंबई - घाटकोपर पूर्वच्या कामराज नगर येथे एका 14 वर्षाच्या मुलीला निर्मनुष्य इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सलीम ऊर्फ बाबू शेख (वय-23) आरोपीला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजून लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड - मद्यपान करायला लावून लैंगिक अत्याचार
घाटकोपर पूर्वच्या कामराज नगर येथे एका 14 वर्षाच्या मुलीला निर्मनुष्य इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सलीम ऊर्फ बाबू शेख (वय-23) आरोपीला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
![अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजून लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड physical abuse case in ghatkopar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5586951-thumbnail-3x2-rape.jpg)
काल (दि.2 जाने)ला रात्री सातच्या दरम्यान कामराजनगर मधील पीडित मुलगी आईसोबत कामराजनगर मधील बाजारात गेली होती. परंतु, बाजारात गर्दी जास्त असल्याने ती पुन्हा घराकडे एकटीच निघाली. रस्त्यात तिला आरोपी सलीम भेटला. संबंधित आरोपी याच विभागात वास्तव्यास असल्याने मुलगी त्याला ओळखत होती.
सलीमने घरी सोडण्याचे सांगून तिला नेताजी नगर या भागात नेले. यानंतर तिला 'भूत बंगला' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओसाड इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले. त्याने या ठिकाणी मद्यपान करत पीडितेला देखील मद्यपान करायला सांगितले. परंतु मुलीने नकार दिला. त्यानंतर सलीमने मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ दाखवत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलगी जोरात ओरडू लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी तिची सुटका केली. आरोपी सलीमला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पंतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.