महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Phone Taping Case : संजय राऊत आणि एकनाथ खडसें यांचाही फोन टॅप; रश्मी शुक्लावर गुन्हा दाखल

राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

रश्मी शुक्ला
रश्मी शुक्ला

By

Published : Mar 5, 2022, 6:40 AM IST

मुंबई- वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई पोलिसांकडून कुलाबा पोलीस स्थानकामध्ये रश्मी शुक्ला यांच्याविरोधात टेलिग्राफ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत तसेच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांचा फोन टॅपिंग केला असल्याचा उल्लेख एफआयआर कॉपी मध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याच्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयाच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून 2019 मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात देखील सर्वात प्रथम फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पीएस येथे गुन्हा दाखल आहे. राजकीय नेत्यांचे फोन टॅप करणं वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर केला त्यात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या नंतर त्यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या विरोधात रेशमी शुक्ला यांनी FIR रद्द करण्यात यावा याकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा दिला आहे कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आल्या आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details