मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेने 1 कोटी लसीच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 8 पुरवठादारांनी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र या प्रक्रियेतून कोणतेही कारण न देता फायझर अस्ट्रॅाझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली आहे, यामुळे इतर 7 पुरवठादारांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती पालिकेचे विशेष उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली. सध्या मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखता यावा म्हणून 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. ही मोहीम सुरू असताना लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे, लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पालिकेने एक कोटी लसीच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे.
फायझर ॲस्ट्राझेनेकाची माघार-
ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून फायझर अस्ट्रॅाझेनेकाची माघार - फायझर अस्ट्रॅझेनेकाची माघार
युरोपातील रोमानिया देशातील ओटू ब्ल्यू एनर्जी एसआरएल या कंपनीने फायझर कंपनीची ॲस्ट्राझेनेका लस पुरविण्याची तयारी दाखवली हाेती. मात्र या पुरवठादाराने आज आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती पालिकेला ईमेलच्या माध्यमातून दिली आहे.
फायझर अस्ट्रॅाझेनेका