मुंबई:महाराष्ट्रात सध्या पाॅप्युलर फ्रंट वर छापेमारी सुरु आहे या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे की, सर्व काही नियमानुसार होत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. पुरावे गोळा केल्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. मी म्हणेन की पीएफआयला देशात फूट पाडायची होती. त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत सरकार सरस्वतीचे फोटो हटवणार नाही असे सांगत, त्यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर टीकाही केली आहे. मुंबईत मंत्रालयात ते बोलत होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) च्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाई नंतर त्यांच्यावरील कारवाई योग्य आहे की नाही? याबाबत वाद निर्माण झाला आहे. याविषयी बोलताना फडवणीस म्हणाले की, पीएफआय वर केलेली कारवाई ही पूर्णपणे योग्य आहे. याबाबत संपूर्ण आढावा घेतल्यानंतरचही कारवाई करण्यात आलेली आहे. दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे आणि देशाविरुद्ध युद्ध छेढणे असे काम या पीएफआय च्या कार्यकर्त्यांचं काम असल्याकारणाने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत.