मुंबई -पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पीएफआय संघटनेच्या विरोधात ठोस पुरावे असल्याशिवाय एवढी मोठी कारवाई केली जाणार नाही. अशा देश विरोधी कृत्याच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. या संघटनेचा सेमी संघटनेची देखील संबंध असल्याचे समजत आहे. मात्र, ही कारवाई या आधीच होणे गरजेचे होते अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा - देश पातळीवर पीएफ संघटना काम करतेय. त्यामुळे गेल्या दोन वर्षात पी एफ आय संघटना ही देशभरात वाढलेली नाही असे मत वळसे पाटील यांनी व्यक्त केल आहे. तसेच, रजा अकादमी विरोधात देखील काही पुरावे असतील तर केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा असे मतही दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.