मुंबई -कोरोनामुळे सततच्या लॉकडाऊनमुळे आधीच मुंबईकरांचे कंबरडे मोडले आहे. आता गेल्या काही दिवसानापासून सततच्या इंधन दर वाढीमुळे सर्व सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची भाव वाढ केली आहे. आज पेट्रोल २३ पैसे आणि डिझेल ३१ पैशांनी महागले आहे. या दरवाढीने मुंबईत पेट्रोल १००.४ रुपयांवर गेले आहे. डिझेलचे भाव देखील ३१ पैशांनी वाढले असून डिझेल ९१.९७ रुपये दराने आता खरेदी करावे लागणार आहे.
मुंबईत पेट्रोल शंभरीपार; मुंबईकरांना महागाईचा फटका
आज पेट्रोल २३ पैसे आणि डिझेल ३१ पैशांनी महागले आहे. या दरवाढीने मुंबईत पेट्रोल १००.४ रुपयांवर गेले आहे. डिझेलचे भाव देखील ३१ पैशांनी वाढले असून डिझेल ९१.९७ रुपये दराने आता खरेदी करावे लागणार आहे.
मुंबईत पेट्रोल १००.४ रुपयांवर-
गेल्या काही दिवसापासून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशात महागाईची झळ सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल २३ पैसे आणि डिझेल ३१ पैशांनी वाढ केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर आत मुंबईतही पेट्रोलचा भाव विक्रमी शंभरीपार झाले आहे. दरम्यान, मुंबईत यापूर्वीच प्रीमियम पेट्रोल शंभर रुपयांवर गेले आहे. नव्या दर वाढीनुसार मुंबईत पेट्रोल १००.४ रुपयांवर गेले आहे. डिझेलचे भाव देखील ३१ पैशांनी वाढले असून डिझेल ९१.९७ रुपये दराने आता खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना, लॉकडाऊनची झळ सामान्यांना बसत असताना दुसरीकडे महागाईने देखील सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.
आजचे असे आहे दर -
आज दिल्लीत पेट्रोल ९३.६८ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.७२ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव १००.४ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८४.६१ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.३९ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८७.४६ रुपये प्रती लीटर झाले आहे.
इंधन मागणी वाढली-
कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणण्यानुसार, ७० डॉलरच्या नजीक पोहोचला आहे. इंधन मागणी वाढल्याने सध्या तेलाची बाजारपेठ तेजीत असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्युटच्या आकडेवारीनुसार २१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेत तेलाचा साठा ४.३९ दशलक्ष बॅरल आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडा इंधनाला मागणी राहण्याची शक्यता आहे.