मुंबई - निवडणुकीच्या हंगामात पेट्रोलच्या दरात ( Petrol price hike after elections ) कोणतीही वाढ झाली नव्हती. मात्र, आता निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोलच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा -Prajjwala scheme scam : 'प्रज्ज्वला योजने'च्या चौकशीसाठी समिती नेमणार - ठाकूर
आजपासून नवे दर
सोमवार पर्यंत पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, मध्यरात्री यात 80 पैशांनी वाढ करण्यात आली. हे नवे दर आज सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतील. पेट्रोल सोबतच घरगुती वापराच्या गॅसमध्ये देखील तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, या नव्या कितमीनुसार तुम्हाला एका सिलेंडरसाठी तब्बल 1 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईतील पेट्रोल, डिझेलचे दर
137 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये एक लीटर डिझलची किंमत 95 रुपये झाली आहे, तर एक लीटर पेट्रोलची किंमत 110.82 रुपये इतकी झाली आहे.
हेही वाचा -Best : ओळख पटवून, पुरावे पाहूनच गहाळ मोबाईल 'बेस्ट' प्रवाशांच्या ताब्यात