मुंबई : कुख्यात गुंड गजा मारणेच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु राज्य सरकारने या याचिकेला विरोध करत पोलीस तक्रार दाखल झाल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. जेलमधून सुटल्यावर गजा मारणेच्या समर्थकांनी घातलेला धुडगुस कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि त्यावरून गजा मारणेवर कारवाई करण्यात आली. आता या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून गुरूवारी 18 मार्च रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका
जेलमधून सुटल्यावर गजा मारणेच्या समर्थकांनी घातलेला धुडगुस कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि त्यावरून गजा मारणेवर कारवाई करण्यात आली. आता या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून गुरूवारी 18 मार्च रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.
गजा मारणेची काढली होती मिरवणूक
पुणे येथील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणेला जावळी तालुक्यातील मेढा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी जेरबंद केले. तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेला गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो महाबळेश्वर वाई परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत होता. मारणे गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच खात्री पटवून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांवर माध्यम व सामाजिक स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे फरार झाला होता.