मुंबई - कोरोना व्हायरसचा विळखा वाढत असताना रुग्णांची संख्यासुद्धा वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन विभाग स्थापित करण्यात जरी आले असले तरी यात कस्तुरबा रुग्णालयात मांजरी व घुशींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात अॅड सागर कुर्सिजा यांनी दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.
...म्हणून कस्तुरबा रुग्णालयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
कोरोना व्हायरसचा विळखा वाढत असताना रुग्णांची संख्यासुद्धा वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कस्तुरबा रुग्णालयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका आली असून यावर तात्काळ सुनावणी सोमवारी होणार आहे. याबरोबरच याचिकाकर्त्या वकिलांनी न्यायालयात याचिकेसोबत कस्तुरबा रुग्णालयातील सद्यस्थितीतील फोटो व रुग्णांच्या आहाराचा तक्तासुद्धा सादर केला आहे. येत्या सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.
दरम्यान राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 52 झाली असून यात मुंबईतील 11 नागरिक आहेत.
Last Updated : Mar 20, 2020, 6:37 PM IST