मुंबई -एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्रमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील आमदार सुरत मार्गे गुवाहाटी येथे नेण्यात भ्रष्टाचार झाला आहे. असा आरोप करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता काँग्रेसचे सदस्य आणि वकील मधु व्ही होला यांनी शुक्रवारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
सोमवारी याचिकेवर सुनावणी - एकनाथ शिंदे यांनी आमदारांना पडली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण आणि भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी बनवलेले आमदारांचा प्रकरण सत्र न्यायालयात पोहोचले आहे. आता यावर सत्र न्यायालयात सोमवारी याचिकेवर सुनावणी होणार आहे.
याचिकेत म्हटले आहे की, शिवसेनेच्या ज्या व्यक्तींना विमानात बसवून महाराष्ट्रातून गुवाहाटीला सुरतला नेण्यात आले होते. त्यांना सुरतमार्गे नेण्यात यावे आणि त्यांचे बयाण नोंदवावेत आणि त्यांना भारतीय जनता पक्षाकडून मदत मिळाली असेल. याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.