मुंबई - अपक्ष खासदार मोहन डेलकर मृत्यू प्रकरणी सिल्व्हासाचे जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या दबावामुळे मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
मोहन डेलकर मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल - मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
अपक्ष खासदार मोहन डेलकर मृत्यू प्रकरणी सिल्व्हासाचे जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसंदर्भात दाखल झालेला एफआयआर रद्द करण्यासाठी दादरा आणि नगर हवेलीचे जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटले यांचे खंडपीठ याचिकेवर सुनावणी करणार आहे.
सिंग यांना आत्महत्या करण्याच्या आरोपाखाली एफआयआरमध्ये नाव देण्यात आले होते, ज्याला कोणताही आधार नसल्याचे याचिकेत नमूद केले आहे. केंद्रशासित प्रदेशातील खासदार असलेल्या डेलकर यांनी गेल्या महिन्यात मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती आणि घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली होती. वरिष्ठ अधिवक्ता अमित देसाई यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले की, आत्महत्या करण्याच्या घटनेचे प्रकरण सिद्ध करण्याचे षडयंत्र किंवा हेतू असले पाहिजेत आणि यात तसे नाही.
याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. मोहन डेलकर हे 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. ते दादरा आणि नगर हवेली येथून सात वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते.