मुंबई- राजधानी मुंबईसह राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण संस्थानी कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात मनमानी सुरू केली आहे. मोलकरणीपासून अनेकांची अडवणूक करणे, त्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट मागणे असे प्रकार सुरू आहेत. तेव्हा आता गृहनिर्माण संस्थाच्या या मनमानीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ॲड. युसुफ इक्बाल युसुफ यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे सामायिक नियमावली तयार करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहार बंद होते. आता अनलॉकमुळे हे व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र, अनेक सोसायट्या दूधवाला, मोलकरणी आणि इतरांना सोसायटीत येण्यास मज्जाव करत आहेत. कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आणण्याची जबरदस्ती करत आहेत. त्यांच्या या मनमानीमुळे अनेक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोसायट्यांना असे नियम करण्याचा कोणताही अधिकार नाही. तरीही सोसायटी पदाधिकारी आपले नियम पुढे रेटत आहेत.