महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, ठाण्यातील न्यायालयात याचिका दाखल - एकनाथ शिंदे यांच्याविरोधात याचिका दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका ( Petition filed against CM Eknath Shinde ) दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री दालनात सत्यनारायणाची पुजा घातल्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे

By

Published : Jul 29, 2022, 2:45 PM IST

Updated : Jul 29, 2022, 4:29 PM IST

ठाणे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका ( Petition filed against Chief Minister Eknath Shinde ) दाखल. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री दालनात सत्यनारायणाची पुजा घातल्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य धर्मनिरपेक्ष राज्य असून संविधानिक ठिकाणी अशा प्रकारची वागणूक चुकीची असल्याचे याचिकाकर्ते धनाजी सुरोसे ( Dhanaji Surose ) यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी 1ऑगस्ट रोजी ठाणे न्यायालयात सुनावणी ( Hearing in Thane court on August 1 ) आहे. सात जुलै रोजी मुख्यमंत्री कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायणाच्या पूजेच्या विरोधात आता ठाण्यातल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने याचिका दाखल केलेली आहे.या याचिकेमुळे अनेक अडचणींना समोरे जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सरकार ला आणखी एका अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांची शिंदे विरोधात याचिका

ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसेंची याचिका -मंत्रालयातील दालनात सत्यनारायणाची पूजा केल्या प्रकरणी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम होत असल्याच सांगत भादवी कलम ४०६ प्रमाणे ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंद पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करत पुन्हा सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी राज्यभवनात मुख्यमंत्री पदाशी शपथ विधी पार पडली. या शपथ विधीनंतर आपण स्थापित केलेली सत्ता सुरळीत सुरु राहावी यासाठी ७ जुलै रोजी मंत्रालयाच्या दालनात सत्यनारायण पूजा करून कारभाराला सुरुवात केली होती. याच सत्यनारायण पूजेचा विरोध दर्शवत ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी ठाणे न्यायालयात भादवी कलम ४०६ प्रमाणे ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी या याचिकेवर पहिली सुनावणी होणार आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयातून न्याय न मिळाल्यास मुंबई सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा धनाजी सुरोसे यांनी दिला आहे.



शासकीय कार्यालयात पूजा -एखाद्या शासकीय कार्यालयात सत्यनारायण पूजा करणे हे शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे ही उल्लंघन केले आहे. याकृतीमुळे धर्मनिरेक्षतीत असलेल्या नागरिकांच्या भावना दुखावल्यात तसेच समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केले गेले असल्याचा आरोप याचिकाकर्ते सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी केला आहे. मुख्यमंत्री पद हे संविधानिक आहे. त्यांनी कोणत्याही धर्माची, पंथाची बाजू न घेता, कोणत्याही धार्मिक वादाला अनुसरून काम करू नये असे असताना त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सुरू करताना ७ जुलै २०२२ रोजी आपल्या दालनात सत्यनारायण पूजन केली. हे कृत्य भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध, अवमान, करणारे आहे.

हेही वाचा -मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 48 इमारती पाडण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

एकनाथ शिंदे शिक्षेस पात्र -भारतीय राज्यघटनेने मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये धार्मिक पूजा करता येत नाही. याप्रकरणी भादवि कलम ४०६ प्रमाणे एकनाथ शिंदे शिक्षेस पात्र आहेत. शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन आहे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे ही उल्लंघन केले आहे. तरी त्यांच्या विरोधात तक्रार क्रमांक १६७६/२०२२ प्रमाणे मे न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी ठाणे यांच्या न्यायालयात सुरोसे यांनी तक्रार केली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कोणत्याही धर्माचे आचरण करता येत नाही. त्यानुसार कोणत्याही सरकारी कार्यालयात कसल्याही प्रकारची देवपूजा, धार्मिक विधी, सत्यनारायण, देवांचे फोटो लावणे नमाज पडणे आदी कृती असंवैधानिक व बेकायदेशीर समजण्यात येतात. संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वानुसार भारतातील सरकार, सरकारी कार्यालये धर्मनिरपेक्ष असली पाहिजेत. त्या ठिकाणी कोणत्याही धर्माचे आचरण कोणालाही करता येत नाही. भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे. देशातील सर्वोच्च कायदा म्हणजे भारतीय संविधान देशातील सर्व यंत्रणा संविधानातील तरतुदीनुसार चालतात. संविधानातील तरतुदींना बाधक असणारे कायदे, आदेश, निर्णय, कृती बेकायदेशीर समजण्यात येतात. एकनाथ शिंदे यांनी यांच्या शपतविधीनंतर मुख्यमंत्री म्हणून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याआधी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात सत्यनारायणाची पुजा केली होती.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने याच मुद्यावर काही वर्षापूर्वी एक परिपत्रक काढून महाराष्ट्रातील सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालय, शिक्षण संस्थांमध्ये आणि परिसरात कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी, पूजा (कोणत्याही धर्माचा) करण्यास मनाई केली असून, सरकारी, निमसरकारी कार्यालये यामध्ये देवीदेवतांचे फोटो लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयात लावण्यात आलेले धार्मिक फोटो सन्मानाने लवकरात लवकर काढून टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -निर्दयी : रेल्वे स्थानकावर पोलीस जवानाची वृद्धाला लाथाबुक्काने मारहाण, Video व्हायरल

Last Updated : Jul 29, 2022, 4:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details