महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दारू खरेदीसाठी तळीरामांची दुसऱ्या दिवशीही चेंबूरमधल्या दुकानांसमोर गर्दी - Peoples rush in wine shop ques in Chembur, Mumbai

आज दुसऱ्या दिवशीही मुंबई उपनगरातील चेंबूरमध्ये तळीरामांनी काल सारखीच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.याठिकाणी काही लोक सोशल डिस्टन्स शारीरिक अंतर पाळण्याचा नियम पायदळी तुडवत होते. तर अनेक जण रस्त्यावर गर्दी करत होते. यासाठी पोलिसांना बळाचा सुद्धा वापर करावा लागत आहे.

Peoples rush in wine shop ques in Chembur, Mumbai
तळीरामांची दुसऱ्या दिवशीही दुकानासमोर गर्दी

By

Published : May 5, 2020, 6:07 PM IST

मुंबई - देशात कोरोना संकट वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने 3 ते 17 मेदरम्यान तिसरा लॉकडाऊन सर्वत्र लागू केला. मात्र यात काही निर्बंध शिथिल करण्यात आले . यात दारूची दुकान कालपासून सुरू झाली आणि मुंबईतील दारू दुकानासमोर तळीरामनी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. आज दुसऱ्या दिवशीही उपनगरातील चेंबूरमध्ये तळीरामांनी काल सारखीच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

तळीरामांची दुसऱ्या दिवशीही दुकानासमोर गर्दी

मुंबईत कोरोना विषाणूच्या रुग्णात झपाटयाने वाढ होत असून मुंबई रेड झोनमध्ये आहे. गेले दीड महिना झाले तळीरामांचा घसा या दरम्यान कोरडा पडला होता. आज दुसऱ्या दिवशी चेंबूरच्या अमर महाल पुला शेजारील दुकानसमोर दारू खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याठिकाणी काही तळीराम सोशल डिस्टन्स शारीरिक अंतर पाळण्याचा नियम पायदळी तुडवत होते. तर अनेक जण रस्त्यावर गर्दी करत होते. यासाठी पोलिसांना बळाचासुद्धा वापर करावा लागत आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details